Traditional Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Indigenous Seed : पारंपरिक बियाण्यांपासून उच्च दर्जाच्या वाणांची निर्मिती शक्य

Desi Seed Variety : आपल्याकडे असलेल्या पारंपरिक बियाण्यांचे जतन करून पूर्वजांनी ठेवलेला बियाणे वारसा जतन करावा. असे केल्यास आपण अन्नधान्याच्या बाबतीत प्रगती साधू शकतो.

Team Agrowon

Buldana News : आपल्याकडे असलेल्या पारंपरिक बियाण्यांचे जतन करून पूर्वजांनी ठेवलेला बियाणे वारसा जतन करावा. असे केल्यास आपण अन्नधान्याच्या बाबतीत प्रगती साधू शकतो.

तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पारंपरिक बियाण्यांचा वापर करून नावीन्यपूर्ण व दर्जेदार वाणांची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते, असे नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन केंद्राचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी प्रतिपादन केले.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन आणि बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २७) आरोग्य आणि पोषण सुरक्षेसाठी वनस्पती आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आला. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, प्रमुख शास्त्रज्ञ तथा नोडल अधिकारी डॉ. एस. के. कौशिक, डॉ. कविता गुप्ता, डॉ. सुशील पांडेय, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील गोमासे, भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद वाकळे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT