Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : भूसंपादन भरपाईवर उच्च न्यायालयाचे दिशानिर्देश

Land Acquisition Compensation : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष असेच एक प्रकरण आल्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने थेट दिशानिर्देशच निश्‍चित केले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : भूसंपादन प्रक्रियेदरम्यान नुकसानभरपाईची रक्कम पात्र व्यक्तींच्या खात्यात जमा करताना अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष असेच एक प्रकरण आल्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने थेट दिशानिर्देशच निश्‍चित केले.

या निकालाची प्रत राज्यातील सर्व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. या महत्त्वपूर्ण निकालामुळे संबंधितांना त्वरित दिलासा मिळणार आहे.

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाअंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील (जि. चंद्रपूर) सूरबोडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी हा निर्णय दिला. याचिकेनुसार, तत्कालीन चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ जुलै २०११ रोजी अधिसूचना जारी करून याचिकाकर्त्यांची सूरबोडी येथील शेतजमीन संपादित केली.

त्यानंतर ५ जुलै २०१३ रोजी या जमिनीच्या भरपाईचा राशी जाहीर करण्यात आली. हा मोबदला मान्य नसल्याने या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याचा निवाडा होईपर्यंत संबंधितांनी मोबदला रक्कम न्यायालयात जमा करणे अपेक्षित असते. परंतु, २०२४ पर्यंत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात भरपाईची रक्कमच जमा करण्यात आली नाही.

त्यामुळे ताराचंद बावनकुळे व इतर सात पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने संबंधित दावेदारांना १६ लाख ६९ हजार १९२ रुपयांचा मोबदला देण्याचेही आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. शिल्पा गिरटकर यांनी शासनातर्फे मुख्य सरकारी वकील, वरिष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांनी बाजू मांडली.

दिशा-निर्देशामध्ये काय?

* भूसंपादन प्रकरणांमध्ये नुकसानभरपाईचा निवाडा झाल्यावर कधी-कधी संबंधितांकडून काही कारणांस्तव रक्कमेचा दावा स्वीकारल्या जात नाही. तसे झाल्यास भरपाईची ही रक्कम पुढील ४५ दिवसांत संबंधित न्यायालयाच्या खात्यात जमा करावी.

* या प्रक्रियेत कसूर केल्यास व भरपाई मिळण्यास उशीर झाल्यास त्याचा थेट फटका आता भूसंपादन अधिकाऱ्याला बसणार आहे. या रकमेवरील व्याजाची रक्कम ही संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून कापली जाणार आहे.

* भूसंपादन कायद्याच्या कलम १८ अंतर्गत आलेल्या प्रकरणांवर संबंधित संदर्भ न्यायालयांनी सात दिवसांत निवाडा करावा. तसेच, अधिकाऱ्याने मोबदल्याची रक्कम ही मुदतठेवीत रुपांतरित करून त्यावर व्याज मिळेल, याचीही खात्री करावी.

* हे आदेश राज्यभरातील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठविण्यात यावेत, असेही आदेश न्यायालयाने दिलेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT