Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry Development : ‘पोकरा’, ‘स्मार्ट’मधून पशुवंर्धन विकासासाठी मदत करू

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘‘विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलता विकास प्रकल्प तयार केलेला आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पांचे सहकार्य घेण्यात येईल,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सह्याद्री अतिथिगृहावर शुक्रवारी (ता. ३) झालेल्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रीय गोकूळ मिशनचे सह-आयुक्त डॉ. भूषण त्यागी, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पांचे सहकार्य घेऊन हा प्रकल्प यशस्वी होईल.’’

विखे-पाटील म्हणाले, ‘‘ विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतील. विदर्भ-मराठवाडा दुग्धव्यवसाय विकास प्रकल्प पथदर्शी ठरेल. या प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.’’

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

‘प्रकल्प विदर्भ, मराठवाड्यासाठी फायदेशीर’

श्री. गडकरी म्हणाले, ‘‘विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन दुग्धविकास प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT