Crop Damage Inspection Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Inspection : अतिवृष्टीग्रस्त भागांत केंद्रीय राज्यमंत्री जाधवांकडून पाहणी

Heavy Rain Crop Loss : या भागात गुरुवारी (ता.२६) मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

या भागात गुरुवारी (ता.२६) मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर जाधव यांनी लोणार तालुक्यातील सुलतानपूर, अंजनी, शारा, वेणी, गुंधा तसेच मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, डोणगाव, गोहोगाव, पांगरखेड, जनुना, शेलगाव देशमुख, विश्वी आणि घाटबोरी या गावांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाशी चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यासोबतच, शेतजमिनींचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात माजी आमदार संजय रायमुलकर, बळीराम मापारी, तात्या वाळुकर, भागवत सुलताने पाटील तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT