Paddy Plantation  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Transplantation : शिराळ्यात भातरोप लागणीचे नवे आव्हान

Paddy Farming : शिराळा तालुक्यात ११ मे रोजी पहिल्यांदा पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. खरीप पेरणीपूर्व मशागतीला गती आली होती.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात पावसाने उघडीप दिली असली, तरी शेतात अद्याप पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांना कुरीच्या सहाय्याने पेरणी करणे जवळपास शक्य नाही. परिणामी भात वाफ्यात रोप लागणच करावी लागणार असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर भात पेरणीचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.

शिराळा तालुक्यात ११ मे रोजी पहिल्यांदा पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. खरीप पेरणीपूर्व मशागतीला गती आली होती. १८ पासून या पावसाने सलग आठ दिवस दमदार उपस्थिती लावली. धुव्वाधार पावसाने तालुक्यातील पेरण्या ठप्प झाल्या. पेरणीचे गणित बिघडले.

आजअखेर भातवाफ्यात पाणी असल्याने तिथे पेरणी करता येणे शक्य नाही. अद्याप अनेक ठिकाणी रब्बीची पिके पाण्यातच आहेत. पावसामुळे शेतात जाणाऱ्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. ट्रॅक्टरसारखे वाहन शेतात जाणे दुरापास्त झाले आहे.

शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे, तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आणखी पंधरा दिवस तरी शेतात वाफसा येणार नाही. तोपर्यंत आणखी पाऊस पडला तर पेरणीची कोणतीही कामे करताच येणार नाहीत.

परिणामी पेरणीसाठी राने कशी तयार करावीत, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. मॉन्सूनच्या पावसाच्या हजेरीमुळे तर भातवाफ्यात रोप लागणीशिवाय पर्याय नाही. शेतकरी आता दूरदृष्टी ठेवून भाताचा तरवा टाकत असल्याचे चित्र आहे.

}शिराळा तालुक्यातील खुंदलापूर, मणदूर, मिरुखेवाडी, सोनवडे, आरळा, खोतवाडी, पाजगणी, टेटमेवाडी परिसरामध्ये प्रामुख्याने भातशेती मोठ्या प्रमाणात केली असून साधारणतः १२०० ते १५०० हेक्टरमध्ये लागणी होतात. क्षेत्रात वाढीची शक्यता आहे.

पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मका, भुईमूग पिकाची हानी झाली आहे. शेतात अद्याप पाणी साचून आहे. मॉन्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली तर भाताच्या हुकमी शेतात रोप लागणीशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून भाताचा तरवा टाकला तरच रोप लागण होणे शक्य आहे, अन्यथा हंगाम वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सचिन महालकरी, शेतकरी, शांतिनगर-बिऊर, ता. शिराळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT