Heavy Rain Nashik Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain : येवल्याच्या पूर्व भागात पावसाने दणादाण

Heavy Rain Damage Nashik : सायगाव परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. पेरणी झालेल्या बहुतांश क्षेत्रात पाणी साचून राहिल्यामुळे पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढत असून येवला, इगतपुरी व सुरगाणा तालुक्यात शनिवारी (ता. १४) जोर पाहायला मिळाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वीज पडून जीवितहानी झाली. तर येवल्याच्या पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. परिणामी मृग नक्षत्रात झालेल्या पेरण्या अडचणीत सापडल्याची स्थिती आहे.

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील नगरसूल, अंदरसूल महसूल मंडलांत ४३.३ मिमी इतका मुसळधार पाऊस झाला. या भागात मे व जून महिन्यातील पहिल्या सप्ताहातील मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी ९ ते १२ जून दरम्यान पेरण्या केल्या.

अशातच १२ ते १४ जून दरम्यान सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने दाणादाण उडाली आहे. पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये शनिवारी सलग तिसऱ्या सलग दीड ते दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

सायगाव परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. पेरणी झालेल्या बहुतांश क्षेत्रात पाणी साचून राहिल्यामुळे पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर नगरसूल येथे अनिल पैठणकर यांच्या घराचे पत्रे व भिंत कोसळली; यात त्यांची पत्नी आशा, मुलगी सायली जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोळगाव परिसरात विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय झाडेही पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील गावामध्ये पेरणी झालेले बियाणे उगवणपूर्व खराब होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मका लागवड यासह बाजरी, भुईमूग, मूग काही प्रमाणात सोयाबीन पेरा सुरू झालेला होता. जोरदार पाऊस झाल्याने पेरणी झालेली बियाणे खराब होण्यास वाहून गेल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी केलेला पेरणीपूर्व मशागत, बियाणे व निविष्ठा, पेरणी मशागतीचा खर्च वाया जाऊन पुन्हा दुबार हा खर्च करण्याची वेळ येऊ शकते. मात्र जानेवारीपासून पाणीटंचाईच्या झळा पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या मात्र या पावसामुळे भूजल पातळी टप्प्याटप्प्याने वाढ होत असल्याचे सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी सांगितले.

झालेली जीवितहानी अशी

भागओहळ (ता. त्र्यंबकेश्वर) येथील जगदीश सीताराम लहारे (२५) या तरुणाचा पावसादरम्यान वीज कोसळून मृत्यू

ठाणगाव (ता. येवला) येथील भाऊसाहेब वाळीबा गुंड यांचा बैल वीज पडून दगावला

लोढरे (ता. नांदगाव) येथील संजय निकम यांची गाय रात्री वीज पडून मृत्युमुखी पडली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: मुदखेड, धर्माबाद, किनवट, अर्धापूर, बिलोली तालुक्यांत पावसाची हजेरी

Farm Loan Waiver: हिंगोली जिल्हा बॅंकेअंतर्गत ९०८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती

Additional Tehsil Office: उत्तर सोलापुरातील वडाळ्यात ‘अपर तहसील कार्यालय’ मंजूर

Public Protest: लाल बावट्याचा पुन्हा एल्गार

Ashadhi Wari 2026: सोलापूर जिल्हा परिषदेकडून आषाढी वारीतील विकासकामांच्या निविदांना मंजुरी

SCROLL FOR NEXT