Crop Damage Agrwoon
ॲग्रो विशेष

Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये पावसाने दाणादाण ; दहा मंडलांत अतिवृष्टी

Nanded Rain News: भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत गेलो अलर्ट जारी करून अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) रात्री झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे नांदेड तालुक्यासह तब्बल दहा मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३३.१० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे कापणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत गेलो अलर्ट जारी करून अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार होऊ लागले.

रात्री दहानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाला. या पावसामुळे सध्या कापणी करत असलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे ढीग भिजल्यामुळे नुकसान अधिक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

शनिवारचा पाऊस नांदेड तालुक्यात सर्वाधिक झाला. खालोखाल लोहा, उमरी, माहूर, अर्धापूर, धर्माबाद, नायगाव, कंधार व बिलोली या तालुक्यांत झाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३३.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ९२३.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १०३.४३ टक्के असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

अतिवृष्टी झालेले मंडळ

नांदेड शहर ९५. २५, नांदेड ग्रामीण ७०. ५०, वसरणी ७९. ७५, लिमगाव ९१. ७५, तरोडा ७७. ५०, कुरुळा ७६, माळाकोळी ७१. ७५, माहूर ७०.५० गोळेगाव ७४.२५ व अर्धापूर ६८.२५.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड ६७. १०, बिलोली ४८. ७०, मुखेड २१. ३०, कंधार ३१. ३०, लोहा ४१. २०, हदगाव २२. ०१, भोकर १५. ९०, देगलूर ९. १०, किनवट ११. ८०, मुदखेड ३९. १०, हिमायतनगर १४. ३०, माहूर २९. ३०, धर्माबाद ४२. ८०, उमरी ४४. ६०, अर्धापूर ५४. ७०, नायगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Awareness: शेतकऱ्यांनी जैवखते, जैव कीटकनाशकांच्या वापरातून मृदा आरोग्य जपावे : डॉ. प्रसाद

Pune Credit Plan: पुणे जिल्ह्यासाठी ४.६५ लाख कोटींचा पतपुरवठा आराखडा जाहीर

PDCC Bank: ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

Fishermen Loan Issue: मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डमधून कर्ज मिळेना; दहा हजारपैकी केवळ ३० टक्के अर्जांनाच मंजुरी

Turmeric Crop Insurance: हळदीचा फळपीक विम्यात समावेश

SCROLL FOR NEXT