Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर

Rain News : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक भागांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. साताऱ्यातील तळमावले येथे ११३ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

गेले तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात पाऊस पडत आहे. कोकणातील अनेक भागात जोर वाढू लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार सलामी दिली असून विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. वैभववाडी आणि देवगडला मुसळधारेने रात्रभर झोडपून काढले.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. देवगड येथे एका घरावर वीज पडून नुकसान झाले. रत्नागिरीमध्ये सकाळी काही भागांत हलक्या तर काही भागांत जोरदार सरी बरसल्या. परंतु दुपारनंतर पावसाने उघडिप दिली. भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामांना शेतकरी सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे.

मध्य महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस वाढला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. बारामती, सणसर येथे सर्वाधिक ९०.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पूर्व पट्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची खरिपाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सायंकाळी व मध्यरात्री अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. सलग पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहे.

शुक्रवारी दुपारपर्यंत सर्वत्र उन पडले होते. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. विशेष करून सातारा, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. रहिमतपूर मंडळात सर्वाधिक १०१.५ मिलिमीटर पाऊस पडला. सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यातही चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. कोल्हापूर शहरात तुरळक तर गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपून काढले.

खानदेशात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून होती. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. खरीप पेरण्याच्या सुरुवातीलाच यंदा चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत.

प्रामुख्याने उडीद, मुगाची पेरणी अधिक प्रमाणात होत असलेल्या भागात यंदा लवकर पावसाने सुरुवात केल्याने मूग, उडदाची अधिक पेरणी होईल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. विदर्भातही अजूनही जोरदार पाऊस नसला तरी यवतमाळ भागात पडलेल्या पावसामुळे खरिपाची तयारी करू लागले आहेत.

शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील मंडलनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : नयाहडी, सरळगाव ४१.८, डोळखांब ४१.८, चिपळूण ४३.८, खेर्डी ५६, असुर्डे ६२.५, कळकवणे ५१.०, शिर्शी ४५.३, धामणंद ५६, रत्नागिरी ४६.५, खेडशी ४६.५, फसोप ४६.५, मुरडव ६२.५, माखजन ६०.३, आंगवली ५५.८, देवळे ५६, देवरुख ५६.३, राजापूर ४८.३, नाटे ४३.५, लांजा ५६.८, भांबेड ५१.८, विलवडे ४२.५, देवगड ५३.८, मीठबाव शिरगाव ४३.८, श्रावण ६१.५, पोइप ६०.८, बांदा ४२.८, आजगाव ४५.५, मडूरा ५१.०, वेंगुर्ला ४८.५, कणकवली ७२.५, सांगवे ४२.५, तळेरे ५५.८, वैभववाडी ५९.३, भुईबावडा ५२.५.

मध्य महाराष्ट्र : घोटी ३६.३, श्रीगोंदा ६४.८, काष्टी ५७.३, पेंडगाव ६२.३, कर्जत ४६.५, राशीन ६६.५, कुंभळी ५६.५, खर्डा ५७.३, नान्नज ४४, टाकळी मानूर ६२.०, आंबेगाव ५३.३, वडगाव ४८.५, लोणी ५०.३, सुपा ६५.८, मोरगाव ६५.०, भिगवण ५२.८, इंदापूर ४८.०, लोणी ५६.०, काटी ४५.८, निमगाव ५७.३, अंथुर्णी ४५.५, पाटस ६२.०, वरवंड ४१.८, दौंड ६८.०, टाकळी ७४.५, पेनूर ७९.३, शेटफळ ५४.०, माढा ४२.८, कुर्डुवाडी ७२.०, म्हैसगाव ५७.३, टेंभुर्णी ४०, रांझणी ४०, मोडनिंब ७३.५, लऊळ ७४, कोर्टी ५२.५, पंढरपूर ५३.८, करकंब ६७, तुंगत ५९.८, कासेगाव ६१, सांगोला ५४.३, जवळा ४३.३, सोनंद ४७.५, संगेवाडी ५४.३, दहिगाव ५४.८, नागठाणे ६५.३, तासगाव ५१.५, आणेवाडी ४९.८, कुडाळ ४३.८, तारळे ४४.३, कुठरे ५५.५, कराड ४९, उब्रंज ४४.५, सुपने ४९.०, मसूर ५२.५, शेणोली ४२.८, कुमठे ४१, शिरंबे ५७.८, वाठार-स्टेशन ५१.५, वाठार-किरोली ६५.८, पिंपोडे-बु ५१.०, औंध ५४.५, मलवडी ७०.८, फलटण ६१, आसू ७५, गिरवी ४७.३, वाठार-नि ५६, बरड ८७, राजाळे ५०.५, मांगले ५५.५, गडहिंग्लज ५६.५, कडेगाव ५६.५,

मराठवाडा : परतूर ३९.३, आष्टी ५४, श्रीष्टी ३०, चौसाळा ४४, नेकनूर ३२.८, दसखेड ४५.८, थेरळा ४६.८, कडा ७५.३, धोंडराई ७९.५, औसा ५८.३, भादा ५८.३, कासारशिरसी ५२.८, देवणी ४५.५, सोनोरी ५५.३, इतकूर ४३, नांदापूर ६९,

विदर्भ : मालेगाव ६१.८, दिग्रज ३८.८, कळगाव ३०.३, तूप टाकळी ४०.०, सेलू ७२.८, कमलापूर ४४.

येथे ८० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला :

सावर्डे ८४.३, पावस ८३.८, कोंडगाव ८९.८, देवळाली ८४.५, बारामती ९०.५, सणसर ९०.५, नरखेड ८८.५, करमाळा ८९, अर्जुननगर ९१, जेऊर ९३.३, उमरड ९३.३, चळे ९२, पुसेगाव ९०, खटाव ९०.०, आंबा ८९.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT