Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Crop Damage : भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान

Heavy Rain Crop Loss : कृषी विभागाने २१८ एकर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे. मात्र हे नुकसान यापेक्षा मोठे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात दररोज कोसळणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. रब्बी हंगामात प्रतिकूल परिस्थितीत उभा केलेला हंगाम अस्मानी संकटाने मातीमोल केला आहे. बुधवारी (ता. २८) दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने २१८ एकर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे. मात्र हे नुकसान यापेक्षा मोठे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सिन्नर, येवला, निफाड, मालेगाव, सटाणा, चांदवड, कळवण, नांदगाव, निफाड, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देवळा, पेठ तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

मात्र कृषी विभागाने फक्त इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, कळवण, देवळा या तालुक्यांत प्राथमिक नुकसान दाखवले आहे. प्रत्यक्षात मालेगाव व सटाणा तालुक्यांत नुकसान असताना येथे नुकसानीचा प्राथमिक अहवालात उल्लेख दिसून आलेला नाही. अनेक ठिकाणी शेतात ओढे-नाल्यांतून पाणी वाहू लागले आहे.

जिल्ह्यात ३८ गावे बाधित असून ३७५ शेतकऱ्यांचे नुकसान दाखवण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान निफाड व इगतपुरी तालुक्यात समोर आले आहे. कांदा पिकाचे मोठे नुकसान आहे. बुधवारच्या पावसाने कांदा पिकाचे ८९ हेक्टर, उन्हाळी भुईमुगाचे ३१, टोमॅटो २८, तर उन्हाळी बाजरीचे २३ तर भाजीपाला पिकांमध्ये प्रामुख्याने कंदवर्गीय व वेलवर्गीय पिकांचे २५ हेक्टरवर नुकसान आहे.

विदेशी भाजीपाला, द्राक्ष बागा अडचणीत

सिन्नर तालुक्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विदेशी भाजीपाल्याचे नुकसान आहे. ठाणगाव, वडगाव परिसरात मुसळधार पावसामुळे भाजीपाला लागवडी पाण्याखाली गेल्या.

तर पावसासह वादळी वारा असल्याने पॉलिहाऊसचे आच्छादन फाटले आहे. या ‘ओल्या दुष्काळात तेरावा महिना’ अशीच वेदनादायक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात बागांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी बागांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे; मात्र ट्रॅक्टर चालत नसल्याने फवारण्या करण्यात अडथळे येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT