Agriculture Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : जोरदार पावसामुळे बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात नुकसान

Heavy Rain Crop Loss : जोरदार पावसामुळे बार्शीटाकळी आणि पातूर तालुक्यांत शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमीन खरडली.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बार्शीटाकळी आणि पातूर तालुक्यांत शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमीन खरडली. या संकटग्रस्त भागांना कृषी विभागाचे अधिकारी थेट भेटी देत नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी शुक्रवारी (ता.२७) दुपारी भेंडी महाल व इतर गावशिवारात भेटी देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी महाल भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

नाल्याला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शेतांमधून वाहल्याने पिके खरडून गेली. फळबाग, खरीप पिके नेस्तनाबूत झाली आहेत. मनीष देशमुख या शेतकऱ्याचे हळद, मिरची, कपाशी, संत्रा, मोसंबी बागेचे अतोनात नुकसान झाले.

याशिवाय तेथे इतरही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. श्री. किरवे यांनी बांधावर जात पाहणी केली. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानाची योग्य ती नोंद घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बार्शीटाकळी येथे तालुका कृषी अधिकारी संध्या करवा यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत नुकसानग्रस्त भागात कृषी विभागाचे कर्मचारी भेटी देऊन अहवाल तयार करण्याचे, तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT