Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्गात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Rain News : जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी (ता. १४) सायकांळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भात, नाचणी उत्पादकांची कापलेल्या पिकांची आवराआवर करताना चांगलीच तारांबळ उडाली.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी (ता. १४) सायकांळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भात, नाचणी उत्पादकांची कापलेल्या पिकांची आवराआवर करताना चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागात गडगडाट देखील झाला.

जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजल्यापासून सावंतवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. या परिसरात काही काळ पाऊस झाला. त्यानंतर कुडाळ, कणकवली, दोडामार्ग, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यांच्या काही भागांत पावसाला सुरुवात झाली.

कणकवली तालुक्यात अर्धा तास पावसाच्या सरी बरसल्या. काही भागात पावसाच्या जोरदार सरी देखील झाल्या. सायंकाळी उशिरा काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी झाल्या. सावंतवाडी तालुक्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत या भागात मुसळधार पाऊस सुरू होता.

विजांच्या लखलखाटामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा देखील खंडित झाला. जिल्ह्यात भातपीक कापणी अंतिम टप्प्यात असून नाचणी पीक वेचणी देखील सुरू आहे. पावसाचे वातावरण निर्माण होताच शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांची आवराआवर करण्यास सुरुवात केली.

पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. हवामान विभागाने १७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) सकाळपासून देखील ढगाळ वातावरण आहे. प्रचंड उकाडा जाणवत असून अंगाची लाही लाही होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT