Sindhudurg Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain Update : जोरदार पावसाने सावंतवाडी, दोडामार्गला झोडपले

Sindhudurg Rain News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून सोमवार (ता. ३) सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर अधिकच वाढला आहे.

Team Agrowon

Sindhudurg Weather Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून सोमवार (ता. ३) सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दमदार पावसामुळे भातरोप पुनर्लागवडीच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने ५ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

जिल्ह्यात २४ जूनला मॉन्सूनचे पुनरागमन झाले. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत आहे.

शनिवारी (ता. १) जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार तर काही भागात मध्यम सरी कोसळल्या. त्यानंतर सोमवार पहाटेपासून जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत.

सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग या तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. तर कणकवली, वैभववाडी, वेंगुर्ला, मालवण या तालुक्यांमध्ये पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत. काही भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.

पावसामध्ये सातत्य असल्यामुळे शेतकऱ्यांनी भातरोप पुनर्लागवडीच्या कामांना सुरुवात केली आहे. शेतमळ्यांमध्ये शेतकरी पुनर्लागवड करीत असल्याचे चित्र गावागावात पाहायला मिळत आहे.

पावसाचे सातत्य समाधानकारक

यावर्षी मॉन्सून आगमनानंतर एक दोन दिवसच पाऊस झाला. त्यानंतर हलक्या सरी पडत होत्या. पावसात सातत्याचा अभाव दिसला. लहरी पावसाचा मोठा परिणाम यावर्षीच्या खरिपावर झाला आहे. उशिराने भातरोपवाटिका तयार करण्यात आल्या. त्यामुळे पुनर्लागवडदेखील लांबणार आहे. मात्र सध्या पावसातील सातत्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचत आता हवामान विभागाने सुधवारपर्यंत (ता. ५) मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT