Sindhudurg Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात काही भागांत जोरदार पाऊस

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात विविध भागात शुक्रवारी (ता. २३) दुपारी बारानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात जोरदार सरीदेखील पडल्या.

Team Agrowon

Sindhudurg Rain News : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात विविध भागात शुक्रवारी (ता. २३) दुपारी बारानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात जोरदार सरीदेखील पडल्या.

जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांत अपेक्षित पाऊस झाला नव्हता. चार-पाच दिवसांपासून तर हलक्या सरीदेखील थांबल्या होत्या. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंघावत होते.

अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकांना पाणी देणे सुरू केले होते. तर काही ठिकाणी भात रोपे सुकण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु गुरुवारी (ता. २२) सायकांळी जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर शुक्रवारी सकाळीदेखील काही भागांत हलक्या सरी पडल्या. दरम्यान दुपारी बारापासून जिल्ह्यातील खारेपाटण, तळेरे या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

जोरदार सरी या भागात पडल्या. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागानेदेखील जिल्ह्यात २३ जून ते ६ जुलै या कालावधीत ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे. शुक्रवारी सुरू झालेला पाऊस संपूर्ण जिल्ह्यात पडल्यास काही अंशी शेतीचे नुकसान टळेल अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

Agri Power Supply : कृषिपंपांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करा

Jalgaon Water Crisis : जळगावात पाणीटंचाईचे सावट

Mango Orchard Management: नवीन लागवडीच्या अतिघन बागेत करावयाची कामे

Buldhana Drought : बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

SCROLL FOR NEXT