Kolhapur Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, कधीपर्यंत असणार पाऊस?

Heavy Rain Kolhapur : कोल्हापुरातील राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती.

sandeep Shirguppe

Rain Forecast Kolhapur : मागील अनेक दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने मागच्या २४ तासांपासून जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. १६ ऑगस्टपासून वाहन कोल्हा असलेले मघा (सासूंचा पाऊस) नक्षत्र सुरू झाले. तरीही पावसाची दमदार सुरुवात झाली नव्हती.

परंतु, काल(ता.२४) रात्री नऊनंतर रात्री उशिरापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले. यामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाण्याची तळी साचली. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. माळरानावरील खरिपाच्या पिकांना होत असलेल्या पावसाने बुस्ट मिळाला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाने जोर धरला आहे. कोल्हापुरातील राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. २५ ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार असल्याचे बोलले जात आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. कालपासून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे.

तसेच विदर्भातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत बुलडाण्यातील जांभूळधाबा येथे सर्वाधिक १२५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचल्याने ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तर काही ठिकाणी जमिनीही खरडल्या आहेत.

कोकणात पावसाचा जोर

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच रायगडमधील माणगाव येथे हलका पाऊस पडला. तर रत्नागिरीतील आंजर्ले येथे ४५ मिलिमीटर तर वेळवी ३८, कोतवडे ३९, दापोली ३८, तुळसानी येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी शिडकावा झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT