Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : आखाडा बाळापूर मंडलात अतिवृष्टी

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रविवारी (ता. २२) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ७५ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) मंडलामध्ये अतिवृष्टी (६८.८ मिलिमीटर ) झाली. या दोन जिल्ह्यांत पावसाने सप्टेंबरमधील तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरीचा टप्पा पार केला आहे.

लवकर पेरणी केलेल्या सोयाबीनचा हंगाम सुरू असून शेतातील कापणी केलेल्या तसेच उभ्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणी केलेले सोयाबीन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

परभणी जिल्ह्यातील ४५ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर जास्त होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी १६९ मिलिमीटर तर जून ते सप्टेंबर पर्यंत एकूण सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे.

रविवार (ता. २२) पर्यंत सप्टेंबर महिन्यात २१८.९ मिलिमीटर तर १ यंदा जूनपासून आजवर एकूण ७७८.३ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला.

गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी १३.७ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी १५४.७ मिलिमीटर तर जून ते सप्टेंबर महिन्यात एकूण सरासरी ७९५.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. यंदा आजवर सप्टेंबर महिन्यात २८६.९ मिलिमीटर तर १ जूनपासून एकूण ८६२.५ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (१० मिलिमीटरच्यापुढे)

परभणी जिल्हा ः परभणी शहर १९.८, परभणी ग्रामीण ३७.८, पेडगाव १५.८, जांब १३.५, झरी २८.५, सिंगणापूर २७.८, दैठणा २१.८, पिंगळी ३७.८, टाकळी कुंभकर्ण २१.३, दूधगाव १४.८, मानवत २७.८, केकरजवळा १६, ताडबोरगाव १४.५, रामपुरी २०.५, पाथरी ३०.३, सोनपेठ २८.८, आवलगाव ३३.३, शेळगाव ३३.३, वडगाव ३५.३, गंगाखेड ३८, महातपुरी २२.५, माखणी ५०.५, राणीसावरगाव ३८.५, पिंपळदरी १८.८.पालम ३५.८, चाटोरी ३५, बनवस ११, पेठशिवणी १४.५, रावराजूर ५५.८, पूर्णा ४१.८, ताडकळस ४६, लिमला २५.५, कात्नेश्वर ५४.८, चुडावा ३३.५, कावलगाव १९.८.

हिंगोली जिल्हा ः सिरसम १६.८, खंबाळा १३.५, नांदापूर २६.५, आखाडा बाळापूर ६८.८, डोंगरकडा १९.३, वारंगा १२.८, वसमत २३.८, हयातनगर ११, गिरगाव २०.८, हट्टा ३६.३, टेंभुर्णी १८.३, कुरुंदा ४६.५, जवळा बाजार २१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Rate : ‘छत्रपती’ने उसाचा दुसरा हप्ता ३०० रुपये द्यावा

Rain Update : मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात

Paddy Crop : भोर तालुक्यात आंबेमोहोरचे पीक बहरले

Ginning Industry : ... अन्यथा जिनिंग उद्योग संपून जाईल

Horticulture Production : देशातील फलोत्पादन उत्पादनात ०.६५ टक्के घट

SCROLL FOR NEXT