Nashik Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain News : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. प्रामुख्याने सुरगाणा, पेठ व इगतपुरी तालुक्यांत अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली.

Team Agrowon

Nashik Rain : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. प्रामुख्याने सुरगाणा, पेठ व इगतपुरी तालुक्यांत अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील मनखेड महसूल मंडलात सर्वधिक १०५ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र पूर्व भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

रविवारी (ता. २) सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत सुरगाणा तालुक्यातील मणखेड, सुरगाणा, उंबर ठाणा, बाऱ्हे, बोरगाव या महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. पेठ तालुक्यातील पेठ, जोगमोडी, कोहोर महसूल मंडलांत पावसाचा जोर कायम होता.

इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी, घोटी, धारगाव महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली आहेत. टाकेद, नांदगाव, वाडीवऱ्हे महसूल मंडलांत पावसाचा जोर होता.

त्र्यंबकेश्वरमध्येही संततधार कायम होती. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने भात, नागली, वरई यासाठी रोपे लागवडीची लगबग सुरू आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात पाण्याची हळूहळू आवक सुरू होण्याची स्थिती आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील दिंडोरी तालुक्यातील नानाशी महसूल मंडलात जोरदार पावसाची हजेरी आहे.

कळवणमध्येही दळवट, अभोना परिसरात पावसाचा जोर होता. मालेगाव, देवळा, सिन्नर, येवला व चांदवडमध्ये हलक्या सरी झाल्या. नाशिक शहर परिसरातही वातावरण काहीसे मोकळे होते. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT