Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : परभणी, हिंगोलीत रब्बी पिके, फळपिकांची मोठी हानी

Unseasonal Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ५४ मंडलांत बुधवारी (ता. १०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ५४ मंडलांत बुधवारी (ता. १०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, उन्हाळी भुईमूग, फरदड कापूस, हळद, आंबा, टरबूज आदी फळपिकासंह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ३९ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव या तालुक्यांतील १५ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील काही मंडलांत जोर होता.

सध्या उशिरा पेरणी केलेले ज्वारीचे पीक उभे आहे. अनेक भागांत ज्वारी, गहू या पिकांची सुगी सुरू आहे. तसेच हळद काढणीची कामे सुरू आहेत. रब्बी, उन्हाळी पिके, शिजवून वाळवत घातलेली हळद, वेचणी राहिलेला फरदड कापूस आदींसह आंबा, टरबूज, खरबूज आदी पळपिकांना या वादळी पावसाचा फटका बसला.

दहा दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाली आहे. पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT