Banana Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : आंध्र प्रदेशातील केळीस उष्णतेचा फटका ; महाराष्ट्राला निर्यातीसाठी संधी; दररोज ४० कंटेनरची निर्यात सुरू

Banana Market : राज्यातून केळीची निर्यात वाढली आहे. सध्या रोज ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. त्यातच नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यातील केळीला उष्णतेचा फटका बसू लागला असून, तेथील निर्यातक्षम केळी आवक कमी झाली आहे. याचाही लाभ राज्यातील केळीस होईल, असे दिसत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

चंद्रकांत जाधव

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव ः राज्यातून केळीची निर्यात वाढली आहे. सध्या रोज ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. त्यातच नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यातील केळीला उष्णतेचा फटका बसू लागला असून, तेथील निर्यातक्षम केळी आवक कमी झाली आहे. याचाही लाभ राज्यातील केळीस होईल, असे दिसत आहे.

खानदेशात देशांतर्गत बाजारात पाठवणुकीच्या केळीचे दर कमी झाले आहेत. तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजारातही केळीला लिलावात दर कमी मिळत आहेत. परंतु निर्यातक्षम केळीचे दर टिकून आहेत. कारण अन्य भागात निर्यातक्षम केळी आहे. राज्यात सोलापूरसह खानदेशात सध्या दर्जेदार व निर्यातक्षम केळी आहे. या केळीस चांगला दर सध्या आहे. मागील काही दिवसांत निर्यात वाढली आहे.

निर्यातीच्या केळीला राज्यात १९५० ते २१०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. सोलापुरातही प्रतिक्विंटल २००० ते २२०० रुपये दर आहे. केळीची काढणी वाढली आहे. आवक बऱ्यापैकी आहे. आंध्र प्रदेशातही मुबलक केळी आहे, पण तेथील केळीला उष्णतेचा फटका बसला. तसेच तेथील केळीची काढणी बऱ्यापैकी पूर्ण होत आली आहे. तेथे केळीला १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे.

आंध्र प्रदेशातून रोज १७ ते १८ कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे. सोलापुरातून रोज १८ ते १९ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. खानदेशातून नंदुरबारातून सर्वाधिक सहा ते सात कंटेनर केळीची निर्यात होत आहे. तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत मिळून रोज ११ ते १२ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. सध्या खानदेशात केळीचे दर काहीसे टिकून आहेत. परंतु कमी दर्जाच्या केळीला १००० ते १२०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे.

जळगाव जिल्ह्यात केळीची आवक सध्या कमी आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगरात पुढे आवक वाढेल. यामुळे केळीची निर्यातही वाढेल. सध्या नंदुरबारातील शहादा येथून अधिकची केळी आखातात पाठविली जात आहे. खानदेशात काही शेतकरी गट व निर्यातदार कंपन्या युरोपातही केळी निर्यातीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासंबंधीची कार्यवाही सुरू असून, दरात पुढे किंचित वाढ होईल, असेही दिसत आहे.

आंध्र प्रदेशातील केळीला अडचण

आंध्र प्रदेशात केळीची आवक बऱ्यापैकी आहे. तेथून रोज १६ ते १७ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. परंतु तेथे उष्णता वाढल्याने केळीत टिकवणक्षमता नाही. तेथे तापमान वाढत आहे. यामुळे निर्यातक्षम केळी कमी उपलब्ध होईल. यामुळे तेथे कार्यरत कंपन्या राज्यात निर्यातीसंबंधी केळीची खरेदी वाढवतील, असेही संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT