Weather News  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather News : वैशाख वणव्याने होरपळ वाढली

High Temprature : पूर्वमोसमीच्या सरींनी दिलासा

Team Agrowon

Weather Update : पुणे : सकाळपासून वाढणाऱ्या झळा दुपारच्या वेळी चांगल्याच तापदायक ठरत आहेत. सूर्याच्या तप्त किरणांनी वैशाख वणव्यात जमीन होरपळून निघत असतानाच असह्य उकाड्याने घामाच्या धारा वाहत आहेत. तर काही ठिकाणी दुपारनंतर काळ्याकुट्ट ढगांची दाटी होत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पूर्वमोसमीच्या सरी हवेत गारवा आणत आहे. आज (ता. २२) राज्यात उन्हाच्या झळा वाढून उष्ण लाट, दमट हवामानासह पावसाच्या सरीचा शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश ते मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर केरळ आणि परिसरावर तसेच उत्तर आंध्र प्रदेशात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. नैॡत्य बंगालच्या उपसागरापासून कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. २०) सायंकाळी मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ४३.८ अंश आणि अमरावती, ब्रह्मपुरी, यवतमाळ, धुळे, चंद्रपूर अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. आज (ता. २२) उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण लाटेचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३८.८, धुळे ४२, जळगाव ४३.९, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३०, नाशिक ४०.५, निफाड ४०.८, सांगली ३६.२, सातारा ३७.८, सोलापूर ४०.४, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३६.७, रत्नागिरी ३३, छत्रपती संभाजीनगर ४०.८, नांदेड ४०.६, धाराशिव ४०, परभणी ४०.५, अकोला ४३.८, अमरावती ४२.८, बुलडाणा ४१.५, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४२, गडचिरोली ३८, गोंदिया ३९.३, नागपूर ३९.४, वर्धा ४१.८, वाशीम ४०.६, यवतमाळ ४२.२.

उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ.
४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
जळगाव ४३.९, अकोला ४३.८, अमरावती ४२.८, ब्रह्मपुरी ४२.२, यवतमाळ ४२.२, धुळे ४२, चंद्रपूर ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT