Weather News Agrowon
ॲग्रो विशेष

Weather News : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Weather Update : सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

Weather Forcasting : पुणे : सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ५) विदर्भात उष्ण लाट आणि उष्ण रात्रीचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशापासून विदर्भ, अंतर्गत कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, दिवसा उन्हाच्या झळा कायम आहेत. रात्री देखील उष्ण ठरत असून, उकाडा टिकून राहत आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ब्रह्मपुरी, सोलापूर, अकोला, जेऊर, मालेगाव, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढेच आहे. आज (ता. ५) विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ येथे उष्ण लाटेचा, तर वर्धा येथे उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३९.४, नगर ३९.०, धुळे ४१.०, जळगाव ४०.०, जेऊर ४२.०, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्वर ३२.४, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.९, निफाड ३७.५, सांगली ३९.४, सातारा ३९.२, सोलापूर ४२.२, सांताक्रूझ ३३.२, डहाणू ३३.७, रत्नागिरी ३१.८, छत्रपती संभाजीनगर ३९.५, बीड ४०.५, नांदेड ४०.८, परभणी ४१.२, अकोला ४२.२, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.३, चंद्रपूर ४१.६, गडचिरोली ४०.६, गोंदिया ४०.६, नागपूर ४१.२, वर्धा ४२.५, वाशीम ४१.४, यवतमाळ ४२.०.

- उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
चंद्रपूर, यवतमाळ.
- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :
वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Support: आंदोलन सुरू असले तरी शेतकऱ्यांना सेवा सुरूच; आकृतिबंध रद्दसाठी लढा सुरू; कृषी सेवा महासंघाची माहिती

NCP Meeting 2026: दुष्काळी स्थितीवर राष्ट्रवादीची बैठक; मुंबईत २८ सप्टेंबरला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

Nahata No Confidence: नहाटा यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

Agriculture Minister Bharane: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे तातडीने करा: कृषिमंत्री भरणे

Bank Irregularities: व्यापारी बँकांची ‘हेराफेरी’

SCROLL FOR NEXT