Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : कोकणात आज उष्ण लाटेचा इशारा

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला होता. राज्यात कमाल तापमानाचा पारा २४ ते ३५ अंशांच्या दरम्यान घसरला होता.

Team Agrowon

Hawaman Update : राज्यात सुरू असलेला वादळी पावसाचे वातावरण निवळल्याने राज्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याचे संकेत आहेत.

आज (ता. ९) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या उर्वरित भागांतही कमाल तापमानात वाढ होणार आहे.

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) उन्हाचा चटका कमी झाला होता. राज्यात कमाल तापमानाचा पारा २४ ते ३५ अंशांच्या दरम्यान घसरला होता.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे देशातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. तर अमरावती आणि वाशीम येथे दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा २५ अंशांच्या खाली घसरला होता.

कमाल तापमानाच्या बरोबरच किमान तापमानात घट झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान घसरल्याने अचानक गारठा वाढल्याचे दिसून आले.

दरम्यान, गोव्यापासून अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ आणि मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा बुधवारी निवळून गेला होता.

नैॡत्य राजस्थान परिसरावर तसेच अंतर्गत ओडिशा आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती.

राज्यात आजपासून पाऊस उघडीप देणार असून, कमाल तापमानात ४ ते ६ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवार (ता. १३)पासून राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.१ (१३.२), जळगाव (१४.६), धुळे ३४.५ (११), कोल्हापूर ३२.१ (१९.४), महाबळेश्‍वर २६.३ (१५.८), नाशिक २९.१ (१३.९), निफाड २८.१ (१०.४), सांगली ३२.६ (१७.८), सातारा ३१.३ (१५.४), सोलापूर ३५ (१७.७), सांताक्रूझ ३५.८ (२१.४), डहाणू ३३.७ (१९.४), रत्नागिरी ३७ (२६), छत्रपती संभाजीनगर २५.३ (९.७), नांदेड ३२.८ (१७.६)

परभणी २८ (१६), अकोला २५.२ (१३.४), अमरावती २४.८ (१३.५), बुलडाणा २९.६ (१४.६), ब्रह्मपुरी ३२.७ (१७.४), चंद्रपूर ३२.२ (१७.४), गडचिरोली ३४.२ (१६), गोंदिया ३२.५ (१६), नागपूर ३१ (१४.९), वर्धा २८.५ (१३.८), वाशीम २४.८ (१४.२), यवतमाळ ३५.५ (१३).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT