Soybean Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Harvesting : सोयाबीनचे पीक काढणीवर

kharif Soybean Crop : खानदेशात मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. त्यात सोयाबीन पीक मळणीवर आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. त्यात सोयाबीन पीक मळणीवर आले आहे. पुन्हा पाऊस आल्यास सोयाबीनचे अधिकचे नुकसान चोपडा, जळगाव, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमध्ये वाढेल, अशी स्थिती आहे. पाऊस थांबावा, अशी अपेक्षा सोयाबीन उत्पादकांना आहे.

यंदा सुरुवातीला पावसाचा ताण पडल्याने पेरणी कमी झाली. त्यातच जुलै व ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा खंड होता. ऑगस्टअखेर पाऊस आला. अतिपावसात पिकाचे नुकसान सुरू झाले. सप्टेंबरच्या मध्यानंतरच पीक मळणीवर आले.

या वेळेसही पाऊस सुरूच राहीला. यात पिकांची हानी काही भागात झाली आहे. अजूनही काही भागांत अधूनमधून पाऊस येत आहे. या आठवड्यात रोज खानदेशात काही भागांत जोरदार, मध्यम पाऊस झाला आहे.

यामुळे पिकांना फटका बसला आहे. परिणामी, उत्पादन घटणार आहे. काही भागांत मळणी मागील आठवड्यात झाली. त्यात एकरी एक ते सव्वा क्विंटल सोयाबीन हाती लागला. मजुरी, मळणी व इतर खर्चाच्या तुलनेत पीक परवडले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव, चोपडा, जामनेर, यावल, पाचोरा आदी भागांत पेरणी झाली होती.

जळगाव जिल्ह्यात २८ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. पेरणी बऱ्यापैकी झाली होती. पण नैसर्गिक समस्या कायम राहिल्याने यंदाही सोयाबीनची माती झाली आहे. सोयाबीनची आवकही बाजारात रखडत सुरू आहे. आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. परंतु दरात मागील २० ते २२ दिवसांत घसरणही झाली.

मध्यंतरी दर ६५०० रुपयांवर स्थिर होते. पण हे दर शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मळणी होण्यासाठी कोरडे, निरभ्र वातावरण आवश्यक आहे. मळणीनंतर लागलीच सोयाबीनची शेतात मळणी करून घ्यावी लागते. कारण अधिक आर्द्रतेमुळे दर कमी मिळतात. पण वातावरण प्रतिकूल असल्याने शेतकरी हतबल झाल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT