Wheat Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvesting : गव्हाचे पीक आले सोंगणीला

थंडी बऱ्यापैकी असल्यामुळे गहू, हरभरा व कांदा पिके जोमदार आहेत.

Team Agrowon

Wheat Harvesting टाकळीभान, ता. श्रीरामपूर : टाकळीभान परिसरात ऊन वाढत असल्याने गव्हाचे पीक (Wheat Crop) ओढून (परिपक्व) येत आहे. त्यामुळे महिनाभरात हे पीक सोंगणीला (Wheat Harvesting) येणार आहे.

उन्हाचा पारा ३१ अंशांपर्यंत पोहोचला आहे. टाकळीभानमध्ये रब्बी हंगामात (Rabi Season) गहू ४५० हेक्टर, मका (Maize Sowing) १०० हेक्टर, हरभरा (Chana Sowing) ९१ हेक्टर, कांदा ८०० हेक्टर पेरण्या व लागवडी झाल्या आहेत.

मात्र एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान बहुतांश शेतकऱ्यांनी पेरलेल्या गव्हाचे पीक परिपक्वतेकडे वाटचाल करीत आहे.

थंडी बऱ्यापैकी असल्यामुळे गहू, हरभरा व कांदा पिके जोमदार आहेत. यंदा कांदा पिकाची परिसरात विक्रमी लागवड झालेली आहे व एक ते दीड महिन्यात कांद्याची काढणी सुरू होणार आहे.

मध्यंतरी अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले होते, मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

विजेचा खेळखंडोबा व विहिरींनी तळ गाठल्यामुळे सध्या परिसरात रब्बीचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे. आवर्तनामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT