Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation: धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी पंधरा लाख वृक्षरोपे लागवड

Ek Ped Maa Ke Naam: धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव अभियानाअंतर्गत ‘एक पेड मॉं के नाम’ मोहिमेत तब्बल १५ लाख वृक्ष लागवड करून विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

विकास गाढवे

Dharashiv News: हरित धाराशिव अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायती, १३ नगरपालिका व ३ नगर पंचायती या ठिकाणी ‘एक पेड मॉं के नाम’ ही मोहीम राबवत १५ लाख वृक्ष रोपे लावून विक्रम केल्याने धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये नोंद झाली. 

धाराशिव जिल्ह्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले असून वनराईला अतिशय चांगली विकसित केली तर आसपासच्या जिल्ह्यातील लोकसुद्धा हे पर्यटनासाठी येतील. त्यामुळेच जिल्ह्यातील वनराईचे चांगले नंदनवन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी शनिवारी (ता. १९) केले.

धाराशिव तालुक्यातील शिंगोली शिवारात वन विभागाच्या पाच हेक्टर क्षेत्रावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि लोकसहभागातून हरित धाराशिव अभियानात १५ लाख वृक्ष लागवडीचा प्रारंभ पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

त्या वेळी श्री. सरनाईक बोलत होते. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, सिने अभिनेते स्वप्नील जोशी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाखरा,

अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी वन व्ही. के. करे, प्रादेशिक विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ आदींची

प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी वृक्षदिंडी काढण्यात आली. तर कोनशिलेचे उद्‍घाटन व वृक्ष लागवड केल्यानंतर मुख्य कार्यक्रम स्थळी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT