Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : सध्या आंबा हंगाम सुरू आहे. आंबा काढणीचे काम गतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी बापर्डे येथील पुरुषोत्तम नारायण धुरे यांच्या बागेत ५२५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा सापडला होता.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथील आंबा बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेत ६०५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे. या भागात आढळून आलेले हे सर्वाधिक वजनाचे फळ आहे.

जिल्ह्यात सध्या आंबा हंगाम सुरू आहे. आंबा काढणीचे काम गतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी बापर्डे येथील पुरुषोत्तम नारायण धुरे यांच्या बागेत ५२५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा सापडला होता.

कृषी विभागाने या फळाच्या वजनाची खात्री केली होती. बापर्डे येथील आंबा बागायतदार व रामेश्वर ॲग्रो टुरिझम संचालक बाबूराव वामन राणे यांच्या बागेतील आंबा काढणीचे काम सध्या सुरू आहे.

आंबा काढणी करीत असताना श्री. राणे यांना काही झाडांवरील फळे नियमित आंब्यांपेक्षा आकाराने मोठी दिसून आली. त्यामुळे त्यांनी या फळांचे वजन केले असता एका फळांचे वजन ६०५ ग्रॅम आढळून आले. ४५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत सरासरी फळे दिसून येत आहेत.

साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. या बागेचे व्यवस्थापन श्री. राणे हे नैसर्गिकरीत्या व सेंद्रिय पद्धतीने करतात. या फळांची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी विभागाचे अमोल सदावर्ते, कृषी सहायक एस. व्ही. उलपे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वजनाची देखील खात्री केली.

आंबा बागेचे व्यवस्थापन पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने करतो. त्यामुळे फळाचा आकार, रंग आणि चव दर्जेदार येते. या वेळी सर्वाधिक मोठ्या फळांचे उत्पादन मिळाले. त्याला दर देखील चांगला मिळतो.
- बाबूराव राणे, आंबा बागायतदार, बापर्डे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT