Crop Damage In Marathwada Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Marathwada : मराठवाडा, वाशीम जिल्ह्यात गारपिटीने पिके जमीनदोस्त

राज्यावरील वादळी पावसासह गारपिटीचे सावट अद्यापही कायम आहे. उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यावरील वादळी पावसासह गारपिटीचे सावट अद्यापही कायम आहे. उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. त्यात मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि वऱ्हाडातील वाशीम जिल्ह्यात मंगळवारी (ता. २५) वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने पुन्हा तडाखा दिला.

अनेक ठिकाणी गारांचा अक्षरशः खच पडला. तर प्रामुख्याने केळी, आंबा, पपई, हळद, कांदा पिकांना गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला.

नांदेड जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसला. नांदेड तालुक्यातील लिंबगाव शिवारात गारपीट झाली. त्यामुळे केळी, आंबा या फळ पिकांना फटका बसला. लिंबगावसह पोखर्णी, सोमेश्वर, राहटी, वाघी, नाळेश्वर या भागातील केळी बागांनाही मोठा फटका बसला. लोहा, कंधार, नायगाव, नांदेड, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यांतही मोठे नुकसान झाले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत मंगळवारी दुपारी १ ते ३ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.अनेक मंडलांत मेघगर्जनेसह गारपीट झाली.‌ त्यामुळे केळी बागा मोडून पडल्या.

आंबा, पपई, हळद, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाली. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा, जवळा पांचाळ, (ता.कळमनुरी) येथे वादळी वाऱ्यासह अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. त्यामुळे केळींची झाडे मोडून पडली. शेतात वाळवत घातलेली हळद भिजली.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. परभणी, गंगाखेड तालुक्यांत पावसाने दणका दिला.

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळी हंगामातील टरबूज, खरबूज आदी पिके नेस्तनाबूत झाली.

वाशीम जिल्ह्यात वादळी पावसामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा तालुक्यातील कारखेडा, वरोली, सेवादासनगर, सोयजना आदी भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या भागातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

कोणत्या पिकांचं नुकसान

- नांदेड, हिंगोली, परभणीत केळी बागांना सर्वाधिक फटका

- आंबा, पपई, हळद, कांदा, मोसंबी, भाजीपाला पिके मातीमोल

- जालना जिल्ह्यात टरबूज, खरबूज आदी पिके नेस्तनाबूत

- वाळत घातलेल्या हळदीचे भिजून मोठे नुकसान

- वाशीम जिल्ह्यात फळबागा, भाजीपाला पिकांचे नुकसान

- नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT