Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstrom Crop Damage : संतप्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे निफाडला रास्ता रोको आंदोलन

Hailstrom Affected Farmer Protest : निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तासभर रास्ता रोको आंदोलन करत आक्रोश व्यक्त केला.

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांना नुकसानभरपाईत वाढ, वीजबिल व पीक कर्जमाफी आदी मागण्यांसाठी निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर मंगळवारी (ता. ५) निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तासभर रास्ता रोको आंदोलन करत आक्रोश व्यक्त केला.

या वेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सुजाता वायाळ यांना देण्यात आले. शेतकरी अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

निफाड तालुक्यात ता. २६ नोव्हेंबर रोजी गारपीट व मुसळधार पावसामुळे द्राक्षे, कांदा, ऊस व इतर भाजीपाला या पिकांची वाताहात झाली. कुठलेच पीक हातात राहिलेले नाही अशा परिस्थितीत जगणं मुश्कील झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई अत्यल्प असून, त्यात वाढ करण्यात यावी. विविध कार्यकारी सोसायटी व बँकांचे असलेले पीककर्ज माफ करण्यात यावे, शेतीसाठी असलेले वीजबिले माफ करण्यात यावे, चालू कर्ज माफ करून नवीन पीककर्ज तत्काळ देण्यात यावे, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

तासभर ‘रास्ता रोको’ केल्याने वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, हरिश्‍चंद्र भवर, रावसाहेब गोळे, भाऊसाहेब कापसे, देवदत्त कापसे, नंदू कापसे, दीपक गाजरे, संपत व्यवहारे, जानकीराम धारराव, श्याम गोळे, नंदू पडोळ, माणिक गायकवाड, बाळासाहेब शेळके यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT