Gurudatta Sugar Agriculture
ॲग्रो विशेष

Sugar Industry : ‘गुरुदत्त शुगर्स’ शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर

Gurudatta Sugar Factory : श्री गुरुदत्त शुगर्सने नेहमीच शेतकरी हिताचा कारभार केला आहे. त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात कारखाना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : श्री गुरुदत्त शुगर्सने नेहमीच शेतकरी हिताचा कारभार केला आहे. त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात कारखाना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे.

त्यामुळे कारखाना व शेतकरी यांच्यातील ऋणानुबंध आणखी घट्ट झाले असून त्यांच्या पाठबळावर ‘गुरूदत्त शुगर्स’ने साखर उद्योगात गरूडभरारी घेतली असल्याचे गौरवोद्गार टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी काढले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी (ता. २६) कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या ‘गुरुदत्त किसान कार्ड’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैदयकीय कामी दोन लाख रुपयांचे धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

गुरुदत्त किसान कार्ड योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून २३४ शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी प्रत्यक्ष मदत झाली आहे.

गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये या योजनेतून ९४ शेतकऱ्यांना वैद्यकीय कामी १६ लाख २५ हजार रुपयांची मदत झाली आहे. या वेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, संचालक शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजी सांगले, बबन चौगुले, धोंडिराम नागणे, अण्णासाहेब पवार आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT