Desi Govansh  Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cow Rearing : शेतकऱ्यांना शाश्वत देशी गोपालन प्रशिक्षणात मार्गदर्शन

Indigenous Cow Conservation : पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या ‘शाश्वत देशी गोपालन’ या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच लाभ घेतला.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या ‘शाश्वत देशी गोपालन’ या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच लाभ घेतला. प्रशिक्षणात पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व यवतमाळ जिल्ह्यांतील १६ शेतकरी सहभागी झाले होते.

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देशी गोपालनाचे महत्त्व, भारतातील दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गायींच्या देशी जाती, त्यांची वैशिष्ट्ये व उत्पादन क्षमता, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे व या केंद्रांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम याविषयी केंद्र विस्तार अधिकारी डॉ. मृणाल अजोतीकर यांनी मार्गदर्शन केले.

दुधाचा दर्जा ठरविणारे दुधातील स्निग्धांश व इतर महत्त्वपूर्ण घटक मोजणे व पनीर, श्रीखंड, दही, ताक, लस्सी, इ. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची प्रात्यक्षिके पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सुजित भालेराव यांनी दाखविली. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. धीरज कंखरे यांनी दुग्ध प्रक्रियेचे महत्त्व, फायदे, दुधावर प्रक्रिया करून बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची, केंद्राने अवलंबिलेल्या छोट्या-छोट्या औजारांची- साहित्याची तसेच केंद्राने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विकसित केलेल्या तापमान आर्द्रता निर्देशांकावर आधारित जनावरांमध्ये निर्माण होणारे ताण ओळखण्याचे ॲप्लिकेशन (ॲप) बद्दल माहिती दिली.

जनावरांचा आहार, आरोग्य, प्रमुख रोग व रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे लसीकरण तसेच इतर उपाय याविषयी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रमोद साखरे यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प प्रमुख डॉ. सोमनाथ माने यांनी सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये पशुपालन करताना देशी गोवंशाचे महत्त्व, कृत्रिम रेतन, लिंग वर्गीकृत वीर्य मात्रांचा वापर, एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान या आधुनिक तंत्रज्ञानांचा आजच्या परिस्थितीत वापर व गरज, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या पशुपालन उपक्रमांची माहिती दिली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान सचिन इंगवले यांनी देशी गाय प्रशिक्षण व संशोधन केंद्रातील विविध गोवंशांची व केंद्राने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर प्रशिक्षणार्थींना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील निखिल पवार, संजय टेकाडे व पोपट बोर्डे यांनी नियोजन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production: सोयाबीन लागवड, उत्पादन घटणार

Onion Storage Capacity: कांद्याची साठवणूक क्षमता वाढविण्याची केंद्राकडून तयारी

Wheat Arrival : लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची उच्चांकी आवक

Monsoon Forecast 2026: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra Weather: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT