Namdev Bhujade Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : सोयाबीन, मका पिकांमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

Agriculture Advice : शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक नामदेव भुजाडे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Buldhana News : सोयाबीन तसेच मका पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक नामदेव भुजाडे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने ॲग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जनुणा येथे गुरुवारी (ता.२५) सायंकाळी ‘ॲग्रो-संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सोयाबीन व मका पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अन्नद्रव्य व्यवस्थापनाला महत्त्व आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत श्री. भुजाडे यांनी कोरोमंडलच्या उत्पादनांची सविस्तर माहितीसुद्धा उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

या कार्यक्रमाला कोरोमंडलचे व्यवसाय विश्‍लेषक उपव्यवस्थापक काव्या कृष्णा, विपणन अधिकारी दीपक मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन अवसरमोल यांनी केले. या वेळी त्यांनी ‘ॲग्रोवन’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सूत्रसंचालन कोरोमंडलचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी केले. कोरोमंडलचे अनुप सपकाळ व संतोष धरण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दीपक नरोटे, सागर नरोटे, राजेंद्र नरोटे, रणजित चंदा, सुदाम राजपूत व शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT