Banana Crop Guidance Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Guidance : तांदलवाडी येथे केळी पिकाबाबत मार्गदर्शन

Banana Crop Update : बसस्थानकानजीक सदानंद ऊर्फ प्रेमानंद महाजन यांच्या वाड्यात हा कार्यक्रम झाला. रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.लि. हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

Team Agrowon

Jalgaon Banana News : ‘ॲग्रोवन’तर्फे तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथे केळी लागवड व पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

बसस्थानकानजीक सदानंद ऊर्फ प्रेमानंद महाजन यांच्या वाड्यात हा कार्यक्रम झाला. रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.लि. हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. धीरज नेहेते, शास्त्रज्ञ अतुल पाटील व रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.लि.चे कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे यांनी केळी लागवड, व पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा. लि.चे उत्तर-मध्य महाराष्ट्र भागाचे व्यवस्थापक विकास कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे होते.

शास्त्रज्ञ पाटील म्हणाले, की माती परीक्षण केळी लागवडीपूर्वी करायला हवे. यामुळे जमिनीचे आरोग्य कसे आहे हे लक्षात येते व त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करता येते. जमीन आरोग्यदायी राहिल्यास उत्पादन चांगले येते किंवा तिची सुपीकता धोक्यात आलेली असल्यास ती सुपीक करण्यासाठी कार्यवाही करता येते.

माती परीक्षणामुळे चांगले व्यवस्थापन करून भरघोस उत्पादनही शेतकरी साध्य करतात, असेही ते म्हणाले.

कृषी शास्त्रज्ञ लोणाळे म्हणाले, ठिबकच्या माध्यमातून पिकांचे सिंचन केले जात आहे. त्यात कार्यक्षम पाणी वापर व योग्य पाणी व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबी आहेत.

पाण्याचा अयोग्य वापरही केळी किंवा इतर पिकांसाठी योग्य ठरत नाही. त्यासाठी रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.लि.ची सूक्ष्मसिंचन प्रणाली लाभदायी ठरू शकते. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा कार्यक्षम उपयोग करून आपली उत्पादकता टिकवून ठेवली आहे.

शास्त्रज्ञ डॉ. नेहेते म्हणाले, की केळी लागवड व्यवस्थापनात जमीन व वाण निवडही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीपासून लक्ष देऊन कार्यवाही करावी. लागवड करताना खते व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. खतांचा अतिवापर टाळावा.

कारण यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते व अनेकदा अनावश्यक खते बागेला दिली जातात. रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.लि.चे अधिकृत विक्रेते दैवत अॅग्रो सर्व्हिसेस व प्रगतिशील शेतकरी प्रेमानंद महाजन यांनी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT