Organic Certification Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Certification Course : सेंद्रीय प्रमाणीकरण अभ्यासक्रमाला वाढती मागणी

Organic Farming : आज सेंद्रीय शेतीचे व पर्यायाने अन्नधान्य, भाजीपाल्याचे महत्त्व वाढलेले आहे. सेंद्रीय घटकांची मागणी वाढली आहे. अशा प्रकारची शेती पद्धती करताना त्याचे प्रमाणीकरण करणारी सक्षम यंत्रणा आज उभी राहत आहे.

 गोपाल हागे

Akola News : काळसुसंगत शिक्षण काळाची गरज बनलेली आहे. त्यातही कृषी शिक्षणाचे आज महत्त्व वाढत आहे. या शिक्षण प्रणालीत महत्त्व ओळखून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू झालेल्या सेंद्रीय प्रमाणीकरण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी बाहेर पडली असून यातील अर्ध्या विद्यार्थ्यांना नोकरीसुद्धा उपलब्ध झाली आहे.

आजच्या शिक्षण प्रणालीत नोकरीच्या संधी कमी झालेल्या आहेत. वर्षानुवर्षे प्रतीक्षा करूनही जागा निघत नसल्याने पदवीधर ताटकळत थांबलेले आहेत. दुसरीकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि ईकोसर्ट (फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षापासून सुरू केलेल्या सेंद्रिय प्रमाणीकरण या विषयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आगळावेगळा ठरला आहे. या अभ्यासक्रमाची ३० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी यशस्वीरीत्या बाहेर पडली आहे. या तुकडीमधील अर्ध्याहून जास्त विद्यार्थ्यांना तत्काळ नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध झाली.

आज सेंद्रीय शेतीचे व पर्यायाने अन्नधान्य, भाजीपाल्याचे महत्त्व वाढलेले आहे. सेंद्रीय घटकांची मागणी वाढली आहे. अशा प्रकारची शेती पद्धती करताना त्याचे प्रमाणीकरण करणारी सक्षम यंत्रणा आज उभी राहत आहे. यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ हा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे.

त्यामुळे या अभ्यासक्रमाचे आगळेवेगळे महत्त्व अधोरेखित झाले आहे. राज्यात व देशातही निसर्ग (सेंद्रीय) शेतीला पाठबळ दिले जात आहे. राज्यात जैविक मिशनच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला गेल्या काही वर्षात प्रोत्साहन देण्यात आले.

सेंद्रीय शेतमाल उत्पादकांचे गट, कंपन्या तयार होत आहेत. अशा शेतमालाचे प्रमाणीकरण करण्यासाठी या अभ्यासक्रमाला चांगले भवितव्य निर्माण झाले आहे. या अभ्यासक्रमाची दुसरी तुकडी लवकरच सुरू होणार आहे.

तज्ज्ञांची मार्गदर्शनेही विद्यार्थ्यांना उपलब्ध

गेल्या वर्षात पहिल्या तुकडीचा वर्गखोलीसह प्रत्यक्ष फिल्डवरील अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. शिवाय या क्षेत्रासह निगडीत क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनेही या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती ‘पंदेकृवि’तील या अभ्यासक्रमाचे सहसंचालक डॉ. नितीन कोंडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT