Groundnut Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Subsidy : उन्हाळी हंगामात भुईमूग बियाणे मिळणार अनुदानावर

Groundnut Seed Subsidy : यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी जिल्ह्यात १४०० क्विंटल भुईमूग बियाणे ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानावर उपलब्ध झाले आहे.

Team Agrowon

Buldana News : यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी जिल्ह्यात १४०० क्विंटल भुईमूग बियाणे ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानावर उपलब्ध झाले आहे. या बियाण्याची विक्री सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, महाबीज जिल्हा व्यवस्थापक ए. आर. ठाकरे यांनी केले आहे.

उन्हाळी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानामध्ये भुईमूग बियाण्यासाठी ग्राम बीजोत्पादनातंर्गत अनुदानावर बियाणे विक्री महाबीजमार्फत बुलडाणा जिल्ह्यासाठी विक्रेते व उपविक्रेत्यांद्वारे सुरू झाली आहे.

योजनेमध्ये भुईमूग TAG-24 प्रमाणित वाणाचे बियाणे उपलब्ध आहे.या बियाण्याची २० किलो वजनाच्या बॅगेची मूळ किंमत ३१४० रुपये असून, यासाठी एक हजार रुपये अनुदान दिले जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना हे बियाणे अनुदानित २१४० रुपये प्रति बॅग या अनुदानित दराने मिळेल. बुलडाणा जिल्ह्यासाठी १४०० क्विंटल बियाण्याचा लक्ष्यांक कृषी विभागाकडून देण्यात आला. यासाठी सातबारा, आठ-अ व आधार कार्डची प्रत द्यावी लागेल.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या लक्ष्यांकाच्या मात्रेनुसार योजनेतील समाविष्ट वाणाचे बियाणे निर्धारित प्रवर्गनिहाय शेतकऱ्यांना अनुदानावर खरेदी करता येईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT