Grape Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : बुलढाणा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक निसर्गापुढे हतबल

Farmer Issue : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील शेतीत पुढे येत असतानाच गेल्या तीन-चार वर्षांत निसर्गापुढे हतबल होत आहेत. शिवाय, शासकीय पाठबळही वेळेवर मिळत नसल्याने या शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ लागला आहे.

Team Agrowon

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील शेतीत पुढे येत असतानाच गेल्या तीन-चार वर्षांत निसर्गापुढे हतबल होत आहेत. शिवाय, शासकीय पाठबळही वेळेवर मिळत नसल्याने या शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ लागला आहे.

यंदा नोव्हेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपीट झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील लेंडी पिंपळगाव येथील मधुकर गायके यांच्या एक हेक्टरमधील द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले. अर्ध्या बागेत एकही घड शिल्लक नसल्याची स्थिती आहे. शनिवारी (ता.१३) त्यांच्या बागेची पाहणी केली असता ही वस्तुस्थिती दिसून आली. गायके यांनी पाच वर्षांपूर्वी एक हेक्टरमध्ये द्राक्ष बाग लावली. माणिकचमन व सोनाका जातीची या वेली आहेत.

लेंडी पिंपळगाव परिसरात २६ नोव्हेंबरच्या रात्री अचानक मॉन्सूनोत्तर पाऊस सुरू झाला. त्याशिवाय गारांचाही या भागात मोठा मारा झाला. हा पाऊस १ डिसेंबरपर्यंत सुरू होता. यामुळे द्राक्षवेलींवर लागलेले ९० टक्के घड तुटून पडले. वेलींच्या फांद्याही तुटल्या. त्यानंतर ‘ॲग्रोवन’मध्ये या नुकसानीबाबत वृत्त झळकल्यानंतर यंत्रणा, लोकप्रतिनिधी बांधापर्यंत पोहोचल्या. सर्वेक्षण झाले. मात्र अद्याप हातात मदतीचा एकही रुपया पडलेला नाही.

पीकविम्याची अडचण

जिल्ह्यात द्राक्ष शेतीचे क्षेत्र गेल्या काही वर्षांत वेगाने कमी झाले. आता काही मोजक्याच बागा शिल्लक आहेत. पीकविमा काढण्यासाठी एका महसूल मंडलात किमान २० हेक्टर क्षेत्राची गरज आहे. या मंडलात एवढे क्षेत्र नसल्याने गायके यांना बागेचा पीकविमाही काढता येत नाही. यामुळे बागेला कुठलेही संरक्षण कवच नाही. त्यामुळे गायके यांच्यासमोर संकट उभे आहे.

काही तासांत ८४ मिलिमीटर पाऊस

लेंडी पिंपळगाव शिवारात २६ नोव्हेंबरच्या रात्री तब्‍बल ८४ मिलिमीटर पाऊस

गारपिट झाल्याने वेलींवरील घड तुटून पडले

बागेतून वाहिलेल्या पाण्यासोबत हे घड बांधापर्यंत येऊन थांबले

तब्बल पाच दिवस पाऊस

चांगला पैसा येईल असे वाटत असतानाच ९० टक्के घड तुटले

जे ५-१० टक्के घड शिल्लक राहिले त्यांचेही पुरेसे पोषण नाही.

एप्रिलपासून आतापर्यंत एक हेक्टर बागेसाठी सव्वातीन लाख रुपये खर्च

या बागेच्या नुकसानीचा विधिमंडळाच्या अधिवेशनात उल्लेख

मात्र दीड महिना लोटला तरी अद्याप मदत नाहीच

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT