VNMKV pARBHANI Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : प्रवेश पात्रता परीक्षा न घेता सरसकट अधिछात्रवृत्ती द्या

Latest Agriculture News : ‘फेलोशिप’च्या लाभार्थी संख्येत घट करून ती सारथी ५०, महाज्योती ५०, बार्टी- २०० व टीआरटीआई १०० या प्रमाणे प्रस्तावित करण्यात आली.

माणिक रासवे

Parbhani News : या वर्षी संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) अर्ज सादर केलेल्या पात्र संशोधक विद्यार्थ्यांना कुठलीही प्रवेश पात्रता परीक्षा न घेता सरसकट अधिछात्रवृत्ती मिळायला हवी, अशी मागणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याकडे केली.

संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अधिनस्त सारथी, महाज्योती व बार्टी या स्वायत्त संस्थांमार्फत मराठा, कुणबी, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांना अधिकतम ५ वर्षांसाठी आर्थिक साह्य देण्यात येते. मागील २ वर्षांपासून या संस्थांमार्फत सर्व पात्र पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सरसकट संशोधन अधिछात्रवृत्ती देण्यात आली आहे.

‘फेलोशिप’च्या लाभार्थी संख्येत घट करून ती सारथी ५०, महाज्योती ५०, बार्टी- २०० व टीआरटीआई १०० या प्रमाणे प्रस्तावित करण्यात आली. सर्वंकष समान धोरणान्वये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रस्तावित केलेल्या फेलोशिप लाभार्थी संख्येत किरकोळ वाढ करून ती सारथी, महाज्योती व बार्टी प्रत्येकी २०० आणि टीआरटीआई १०० अशी निश्‍चित करण्यात आली.

ती मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्केसुद्धा नाही. सारथी आणि महाज्योती संशोधन अधिछात्रवृत्ती- २०२३ साठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. परंतु मागील दोन वर्षांच्या अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीत मर्यादित लाभार्थी संख्या नमूद असताना सर्व पात्र विद्यार्थ्यांना कुठलीही प्रवेश पात्रता परीक्षा न घेता सरसकट अधिछात्रवृत्ती दिली.

त्यामुळे या वर्षी तशी सरसकट अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा या वेळी निषेध करण्यात आला. या प्रकरणी पवार यांनी जाहीर माफी मागावी. प्रलंबित फेलोशिप मंजूर करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT