Devna Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Project : सिंचन प्रकल्पास मान्यता द्या

Nana Patole : गोसेखुर्द प्रकल्पा अंतर्गंत असलेल्या धारगाव उपसा सिंचन प्रकल्पाला साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्‍यातील गावांना जोडण्यात यावे, अशी मागणी साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

Team Agrowon

Bhandara News : गोसेखुर्द प्रकल्पा अंतर्गंत असलेल्या धारगाव उपसा सिंचन प्रकल्पाला साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्‍यातील गावांना जोडण्यात यावे, अशी मागणी साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले त्यानुसार, गोसेखुर्द हे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख धरण आहे. धरणातून नेरला, सूर्यवाडा, करखेडा या उपसा सिंचनातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. परिणामी शेतकऱ्यांची सोय झाली आहे.

याच धर्तीवर धारगाव उपसा सिंचन टप्पा-२ योजने अंतर्गंत सर्वेक्षण सुरू आहे. याद्वारे मेंढा (गराडा बु). पिंपळवाडा, कोकनागड, लाखनी, मुरमाडी, सोमलवाडा, सावरी (मुरमाडी), मेंढा (सोमलवाडा), रेंगेपार (कोठा), पिंपळगाव (सडक), आलेसूर, लाखोरी, एकोडी, चांदोरी, आतेगाव, पळसपाणी, मक्‍कीटोला, निपरटोला, जांभळी,

मकरढोकला, परसटोला, बोरगाव, गुढरी, सराटी, सर्पेवाडा, शिंधोरी (सोनेझरी), गोंडसावरी, परसाडी, खेडेपार, चिचटोला, टेकेपार, हमेशा, सामेवाडा, केसलवाडा (पवार), केसलवाडा (वाघाये), वलमाझरी, खैरी या गावांचा समावेश प्रकल्पा अंतर्गंत करण्याची मागणी पटोले यांनी केली आहे. त्यासोबतच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली आहे.

४१ गावांसाठी योजना प्रस्तावित

भंडारा जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली तालुक्‍यातील एकूण ४१ गावांसाठी आठ हजार ५०० हेक्‍टर शेतीसाठी धारगाव उपसा सिंचन योजना दोन प्रस्तावित आहे. धारगाव उपसा सिंचन प्रकल्पासाठी अंदाज ५० दशलधनमीटर पाण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT