Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : धरणग्रस्तांच्या न्यायासाठी सरकार कटिबद्ध ; अधिवेशनानंतर पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावणार

Dam Rehabilitation : पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याबाबत सरकारने यापूर्वी प्रयत्न केले आहेत. अजूनही काही प्रश्न आहेत, त्याबाबतीत अधिवेशन संपल्यावर सातारा, पुणे किंवा मुंबईत बैठक घेतली जाईल.

Team Agrowon

Satara News : ‘‘पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याबाबत सरकारने यापूर्वी प्रयत्न केले आहेत. अजूनही काही प्रश्न आहेत, त्याबाबतीत अधिवेशन संपल्यावर सातारा, पुणे किंवा मुंबईत बैठक घेतली जाईल.

कोयनेसह अन्य धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेऊन जेथे पुनर्वसनाचे प्रश्न राहिले आहेत त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न महायुतीचे सरकार करेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वांग-मराठवाडी धरणग्रस्तांसंदर्भात प्रशासनाकडून काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार बुधवारी (ता. १२) येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, बाळासाहेब सोळसकर, राजेश पाटील-वाठारकर, अॅड. आनंदराव पाटील, सादिक इनामदार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पत्री सरकार म्हणून ज्यांची ओळख होते ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना सव्वाशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मारकाच्या बाबतीत व्हायला पाहिजे होते, त्यापद्धतीने झालेले नाही.

क्रांतिसिंह पाटील यांच्याबद्दल अभिमान असलेला मोठा समाज आपल्यात आहे. त्या सर्वांना समाधान वाटेल असा निर्णय महायुतीच्या सरकारकडून केला जाईल, असेही पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT