Soybean Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : सोयाबीन, हरभऱ्याच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करा

Chana Market : हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. तब्बल २५ हजारांवर शेतकऱ्यांचा चार लाख २५ हजार क्विंटल हरभरा घरात पडून आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : शेती पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, तूर, हरभरा घरात पडून आहे. हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. तब्बल २५ हजारांवर शेतकऱ्यांचा चार लाख २५ हजार क्विंटल हरभरा घरात पडून आहे. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंतची खरेदी शासनाने करावी, अशी मागणी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केली.

श्री. ठाकरे हे रविवारी (ता. १६) माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘नुकतेच केंद्र शासनाने केलेल्या सर्वेक्षणात देशातील सात जिल्हे मागासलेले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे. पूर्वी वैधानिक महामंडळ अस्तित्वात होते. आता मात्र वैधानिक महामंडळ गुंडाळून ठेवण्यात आले आहे.

परिणामी, विकास पूर्णतः थांबला आहे. अमरावती विभागात आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये यवतमाळ अग्रस्थानी आला आहे. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आदी पिकांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. सध्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे एक लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले नाही.

विशेष म्हणजे खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सोळा हरभरा खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत, परंतु अद्याप नोंदणी प्रक्रिया सुरू झाली नाही. जिल्ह्याभरातील २५ हजार शेतकऱ्यांकडे चार लाख २५ हजार क्विंटल हरभरा घरात पडून आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत नोंदणी प्रक्रिया चालू झाली होती, हे विशेष.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. निवडणूक काळात केवळ फसवे आश्‍वासन देण्याचा प्रकार केंद्र आणि राज्य सरकारने केला आहे. विजेचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे.

पाच हजारांवर शेतकऱ्यांनी कोटेशन भरल्यानंतरही कनेक्शन देण्यात आले नाही. प्रत्यक्षात टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे टंचाईचा कृती आराखडा वाढवून द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून केल्या जात असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले. या वेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, संजय महल्ले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT