Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार ः मुख्यमंत्री शिंदे

Agriculture News : महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे. त्याला वाऱ्यावर सोडणार नाही.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : ‘‘महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे. त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाने दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व पंचनामे एकत्र करून नुकसान झालेल्यांना न्याय देऊ,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे गुरुवारी (ता. ३०) केले. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे (ता. खेड) एमआयडीसीमधील कोकाकोला कोला कंपनीच्या उभारणीच्या कामाचे भूमीपूजन आणि रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार योगेश कदम उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘राजकारणापुरते आम्ही कोकणी माणसाला वापरून घेणार नाही. यापूर्वीच्या सरकारमुळे कोकणात हा प्रकल्प उशिरा येत आहे. आमचे सरकार येताच राज्यातील जनतेसाठी विकासाची दारे उघडली आहेत. यापुढे ग्रीनफिल्ड हायवे व कोकण विकास प्राधिकरण निर्मितीला गती देऊ.

आर्थिक भरभराटीसाठी उद्योगाची पावले कोकणात पडावीत, वाढवीत अशी सरकारची भूमिका आहे. पर्यावरण संतुलन राखत औद्योगीकरण देखील महत्त्वाचे आहे. या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार देण्याची सरकारची भूमिका आहे. कोकाकोला कंपनीने देखील स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे.’’

‘‘पाऊस, गारपिटीमुळे राज्यात नुकसान झाले. महाविकास आघाडीने फक्त घोषणा केल्या, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे ते दिले नाहीत. मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. सर्वांगीण विकासातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देऊ,’’ असेही शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT