Ladaki bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladaki bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या निधी वाटपास सुरुवात

Women Empowerment : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरुवात केली. या योजनेतून महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आले.

Dhananjay Sanap

Financial Support : महायुती सरकारनं आता लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास सुरूवात केली असून राज्यातील नव्या १२ लाख ८७ हजार लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थीच्या खात्यात डिसेंबरपर्यंतची रक्कम जमा केली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहिण योजनेनं महायुतीला पुन्हा सत्तेच दारं खुली करून दिली. त्यामुळे या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप झडत होते. परंतु राज्य सरकारने या योजनेचा डिसेंबरची रक्कम वाटपास मंगळवारपासून सुरुवात केली आहे. एकूण ६७ लाख महिलांच्या खात्यात मंगळवारी रक्कम जमा करण्यात आली आहे.

राज्यातील २ कोटी ३४ लाख महिला लाडकी बहिण योजनेस पात्र आहेत. त्यापैकी ६७ लाख महिलांच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित लाभार्थी महिलांना येत्या एक दोन दिवसांत रक्कम जमा करण्यात येईल, असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरुवात केली. या योजनेतून महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आले. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वीच या योजनेचे नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा करण्यात आले होते. या योजनेला सुरुवातीला २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले. त्यापैकी मात्र २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. तर १२ लाख ८७ हजार महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यात आली नव्हती. त्यामुळे या महिलांना लाभ मिळाला नव्हता.

दरम्यान अलीकडेच विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. विधीमंडळाचं अधिवेशन संपताच रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PMEGP Scheme: स्वतःचा उद्योग सुरू करायचाय? सरकारच्या PMEGP अंतर्गत मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज आणि ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत ४५०० क्युसेकने विसर्ग सुरू

MAGNET Mega Clusters: ‘मॅग्नेट’अंतर्गत उभारणार एक हजार कोटींचे मेगा क्लस्टर्स; पणनमंत्री रावल यांची माहिती

Mission Murghas Scheme: पशुधनासाठी चारा टंचाई दूर करण्यासाठी ‘मिशन मुरघास’; ७८ कोटी ४१ लाखांची रुपयांची तरतूद

Kukadi Water Storage: शेतकऱ्यांना आवर्तनाची प्रतीक्षा; कुकडी प्रकल्पात ९४.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा

SCROLL FOR NEXT