Ajit Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा

Ajit Pawar : पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने त्वरित आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने त्वरित आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (ता.१६) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार श्री.चव्हाण यांच्या निवेदनानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राज्य शासनाने २७४० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या योजनेत केंद्र शासनाचा २५, राज्य शासनाचा ४५, तर महापालिकेचा ३० टक्के वाटा आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला ८२२ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. मात्र महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे.

त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी हिस्सा भरण्याची महापालिकेची ऐपत राहिलेली नाही. ही रक्कम राज्य शासनाने भरावी असे पत्र महानगरपालिकेने शासनाच्या नगर विकास विभागाकडे सादर केले. मात्र राज्य शासनाने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे.

महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे अत्यावश्यक कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे आमदार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने महानगरपालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा हिस्सा भरावा अशी मागणी या वेळी आमदार चव्हाण यांनी केली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील आमदार चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात लवकरच आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वस्त केल्याचे आमदार चव्हाण यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT