Wheat Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Stock Limit : गव्हाचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट सरकारने केली कमी

Wheat Price Update : सरकारने २५ लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने बुधवारी (ता. ११) स्टॉक लिमिटची मर्यादा कमी केली.

Team Agrowon

Pune News : सरकारने २५ लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने बुधवारी (ता. ११) स्टॉक लिमिटची मर्यादा कमी केली. घाऊक आणि किरकोळ व्यापारी, प्रक्रियादार आणि मोठ्या विक्री साखळ्या यांची गहू स्टॉकची मर्यादा निम्मी केली आहे.

देशातील गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने प्रथम २४ जून रोजी स्टॉक लिमिट लावले होते. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी स्टॉक लिमिटची मर्यदा कमी केली. सरकारने नफेखोरी करणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्या वेळी सांगण्यात आले. सरकारने स्टॉक लिमिट लावल्यानंतरही देशात गव्हाचे भाव कमी झाले नाहीत.

कारण देशात उत्पादन कमी झाल्याने बाजारातील आवकच कमी आहे. सरकारने स्टॉकमधील गहूदेखील विकला. पण त्याचाही परिणाम भावावर त्या प्रमाणात झाला नाही. सरकारने नुकतेच स्टॉकमधील आणखी २५ लाख टन गहू विक्रीसाठी काढला होता. सरकारने स्टॉकमधील गहू विकल्यानंतर बाजारात गव्हाचे भाव काही प्रमाणात कमी झाले. मात्र गव्हाची उपलब्धता खुल्या बाजारात कमी असल्याने गव्हाचे भाव आणखी वाढले आहेत.

खुल्या बाजारात गव्हाचे भाव वाढतच असल्याने सरकारने स्टॉक लिमिट आणखी कमी केली. आता घाऊक गहू विक्रेत्यांना १ हजार टनांचाच स्टॉक ठेवता येईल. यापूर्वी २ हजार टन गहू स्टॉकची परवानगी होती. तर किरकोळ विक्रेते आणि मोठ्या विक्री साखळ्या आता ५ टन गव्हाचा स्टॉक ठेवू शकतील.

यापूर्वी १० टन गहू स्टॉकची मर्यादा होती. तर प्रक्रियादारांना आपल्या मासिक क्षमतेच्या ५० टक्केच स्टॉक ठेवता येईल, असे केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने म्हटले आहे. तसेच सर्व घटकांना आपल्याकडील स्टॉकची माहिती सरकारला द्यावी लागेल. तसेच आपल्याकडे असलेल्या अतिरिकची स्टॉकची विक्री तातडीने करावी लागेल. गव्हावर ३१ मार्च २०२५ पर्यंत स्टॉक लिमिट असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT