रत्नागिरी ः शासकीय दूध डेअरीमार्फत (Milk Dairy ) अल्पदर दिला जात असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुग्ध संस्था खासगी डेअरीकडे वळल्या आहेत. बुधवारपासून (ता. २) दूधपुरवठा बंद झाल्याने रत्नागिरीतील शासकीय डेअरी अखेर बंद पडली.
पूर्वी रत्नागिरी शासकीय दूध डेअरीला (Government milk dairy) ३३ संस्था दूधपुरवठा करत होत्या. जुलैमध्ये त्यातील ३२ संस्थांनी कोल्हापुरातील दूध संस्थांना दूधपुरवठा सुरू केला. त्यानंतर लांजातील केवळ एक संस्था शासकीय डेअरीला १४०० लिटर दुधाचा पुरवठा करत होती. त्यावर दूध डेअरी सुरू होती; मात्र खासगी दूध डेअरी चालक लिटरला ३३ रुपये दर देत आहेत.
तर शासकीय दूध डेअरीतून केवळ २५ रुपये दर मिळत असल्याने लांजातील एकमेव संस्थेनेही दूधपुरवठा बंद करून खासगी डेअरील दूध पुरवठा सुरू केला. त्यामुळे शासकीय दूध डेअरील होणारा दूधपुरवठा बंद झाल्याने डेअरी बंद केली.
खासगी डेअरीमार्फत दर दहा दिवसांनी दुधाचे पैसे दिले जातात. शासकीय डेअरीमार्फत निधी आल्यानंतर संस्थांना पैसे दिले जातात. रत्नागिरीतील दूध डेअरीमार्फत ऑगस्टपासून सुमारे ३२ लाखांचे देणे एका दूध डेअरीचे आहे. अखेर त्यांनी दूधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी शासकीय दूध डेअरीत अधिकारी, कर्मचारी मिळून ५५ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात १४ कर्मचारी उपलब्ध असून प्रभारींकडेच पदभार आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. दु्ग्ध व्यावसायाला चालना देण्याच्या गप्पा मारणारे सरकार दूध डेअरीबाबत उदासीन आहे.
खासगी डेअरी चालकांनी दूध विक्रीच्या दरात वाढ करताना दूधपुरवाठा करणाऱ्या संस्थांना चांगला दर दिला. मात्र शासकीय डेअरीतून प्रति लिटर २५ रुपये दर दिला जात आहे. २०१८ पासून दुधाचे दर बदलण्यात आलेले नाहीत. दुग्ध विकास खात्यानेही आपल्याच दूध डेअरींकडे दुर्लक्ष केले.जिल्ह्यात दोन शासकीय दूध संकलन केंद्र आहेत. रत्नागिरीतील डेअरीला विविध दुग्ध संस्थांनी दूध देणे बंद केले आहे. याबाबतची माहिती पत्राद्वारे वरिष्ठांना कळवण्यात आली आहे.
- आर. व्ही. जाधव, अधिकारी, दूध डेअरी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.