Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation: गोवर्धन चोपडे यांना मिळाली एकूण ४,४२७ रुपये भरपाई

Kharif Season Compensation: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर कारणाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीकविमा खात्यात जमा केला जात आहे.

 गोपाल हागे

Akola News: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर कारणाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीकविमा खात्यात जमा केला जात आहे.

तळेगाव बाजार (ता. तेल्हारा) येथील गोवर्धन चोपडे यांच्या सर्व खात्यांत मिळून ४,४२७ रुपये पीकविमा जमा केल्याची माहिती विमा कंपनीने दिलेल्या अहवालात दिल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी म्हटले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पीकविमा योजनेतून खरीप हंगामातील अतिवृष्टी व इतर कारणांमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा खात्यात जमा केला जात आहे.

गोवर्धन चोपडे यांच्या एका खात्यात २३१ रुपये ४२ पैसे जमा झाले असल्याचे वृत्त सोमवारी (ता. २१) प्रसिद्ध झाले आहे. परंतु विमा कंपनीने दिलेल्या अहवालानुसार चोपडे यांना १६ एप्रिलला एकूण ४,४२७ रुपये विमा रक्कम अदा करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार ६ नोव्हेंबर २०२४ मधील तरतुदीनुसार अधिसूचित गटातील पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र हे विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास प्राप्त नुकसानीच्या पूर्वसूचनांपैकी १० पूर्वसूचनांचे नमूना सर्वेक्षण करून जिल्ह्यात दोन लाख ६८ हजार २६७ शेतकऱ्यांना ७८ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT