Lotus Flower  Agrowon
ॲग्रो विशेष

Lotus Flower Rate : वाढत्या मागणीमुळे कमळाच्या फुलांना चांगला दर

Flower Farming : वासांबे-मोहोपाडा येथील बाजारपेठेत नवरात्रोत्‍सवानिमित्त भक्तांकडून पूजेसाठी हार, नारळ, ओटी, अगरबत्ती आदी वस्‍तूंबरोबरच कमळाच्या फुलांना मोठी मागणी आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : वासांबे-मोहोपाडा येथील बाजारपेठेत नवरात्रोत्‍सवानिमित्त भक्तांकडून पूजेसाठी हार, नारळ, ओटी, अगरबत्ती आदी वस्‍तूंबरोबरच कमळाच्या फुलांना मोठी मागणी आहे. एक कमळ पाच ते दहा रुपयांना मिळत असल्‍याचे विक्रेत्यांनी सांगितले.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दांडफाटा येथील श्री टाकेदेवी आई माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी हजारो भाविक येतात. नवरात्रोत्सवात अनेकजण कमळाची फुले आवर्जून घेतात. परिसरात गावे, वाड्यांतील दलदलीचा भाग, तलाव, नैसर्गिक तळ्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कमळाची फुले उमलली आहेत.

गणेशोत्‍सवापासून साधारण कमळ उमलण्यास सुरुवात होते. वासांबे-मोहोपाडा येथील बाजारपेठेत एक फुलाला दहा रुपये भाव आहे, जास्‍त फुले घेतल्‍यास पाच रुपयांनी एक फूल विकतो. उन्हामुळे सकाळी लवकर फुले विक्रीसाठी घेऊन यावे लागते, नाहीतर ती कोमेजत असल्‍याचे बाळाराम वाघ या फलाटवाडीतील विक्रेत्यांनी सांगितले.

पूजेत विशेष मान

माणगाव ः शारदीय नवरात्रोत्‍सवात देवीच्या पूजेत कमळाच्या फुलांना विशेष मान आहे. तलाव, नदीकिनारी, साचलेल्‍या पाण्यात, शेतातील पाणथळ जागेत सध्या कमळाची फुले उमललेली दिसतात. पांढरी, गुलाबी, लाल रंगाच्या फुले देवीला अर्पण करण्यासाठी भक्‍तांकडून हमखास खरेदी केली जात आहेत. माणगावमध्ये पाच रुपयांपासून २० रुपयांपर्यंत दर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT