Gokul Milk Agrowin
ॲग्रो विशेष

Gokul Milk : गोकुळ’ देणार दूधदर फरकाचे १०२ कोटी ८३ लाख रुपये

कोल्हापूर जिल्हा दूध संघातर्फे (गोकुळ) (Gokul) यंदा म्हैस व गाय दूधदर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा करण्यात येईल,’

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा दूध संघातर्फे (गोकुळ) (Gokul) यंदा म्हैस व गाय दूधदर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा करण्यात येईल,’ अशी माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली. ‘यंदा, फरकापोटी दूध उत्पादकांना गेल्या वर्षीपेक्षा १९ कोटी रुपये जादा रक्कम मिळेल,’ असेही पाटील यांनी नमूद केले. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून एका अर्थाने ही दिवाळी भेट आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
गोकुळचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. १) झालेल्या पत्रकार परिषदेत दूधदर फरकाच्या रकमेची घोषणा करण्यात आली.

आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांनी, दूध उत्पादकांना अधिकाधिक परतावा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूध उत्पादकांना ७० टक्के परतावा मिळावा असे राष्ट्रीय पातळीवर आवाहन केले होते. तथापि, गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना ८२ टक्के परतावा दिला जातो, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूधदर फरक दिला जातो. त्यानुसार या वर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ५८ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपये, तर गाय दुधाकरिता २९ कोटी ७१ लाख २० हजार रुपये दूध दर फरक व त्यावरील ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४८ लाख रुपये व डिंबेचर व्याज ६ टक्के प्रमाणे ४ कोटी ७२ लाख रुपये व शेअर्स भांडवल ४ वर ११ टक्के प्रमाणे डिव्हिडंड ५ कोटी ९८ लाख रुपये असे एकूण १०२ कोटी ८३ लाख रुपये दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बॅकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून एका अर्थाने ही दिवाळी भेट आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
चेअरमन पाटील म्हणाले, की संघाच्या वेगवेगळया योजनांअंर्तगत वैरण बियाणे, चाफकटर, मिल्को टेस्टर, वासरू संगोपन अनुदान, जातीवंत म्हैस व गाय संगोपन अनुदान, दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी योजना, किसान पॅकेज, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा अशा २७ योजनेवर प्रतिलिटर ७५ पैसे म्हणजेच अंदाजे ३७ कोटी ४१ लाखांची रक्कम उत्पादकांना वेगवेगळ्या अनुदान व सेवाप्रीत्यर्थ दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT