Goat Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Diseases : शेळ्यांतील लाळ्या खुरकुत रोग नियंत्रण

Goat Foot And Mouth Diseases : विषाणूजन्य रोगांमध्ये शेळ्यांमध्ये लाळ्या खुरकूत हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. दोन आठवड्यांपेक्षा लहान करडांमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आहे.

Team Agrowon

Goat Farming : व्यवस्थापनामध्ये होणाऱ्या चुकांमुळे शेळ्या, मेंढ्यांना आजार होतात. यासाठी गोठ्याची स्वच्छता, खाद्य, प्रजनन, गाभणपणातील काळजी, लहान पिलांची काळजी आणि वेळेवर लसीकरण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विषाणूजन्य आजारांवर तत्काळ औषधोपचार उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हाच उपाय आहे. विषाणूजन्य रोगांमध्ये शेळ्यांमध्ये लाळ्या खुरकूत हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.

दोन आठवड्यांपेक्षा लहान करडांमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आहे. तोंडामध्ये फोड येतात,जखमा होतात. ४० टक्के शेळ्या,मेंढ्यांमध्ये पायावर फोड, जखमा होतात. सुरवातीस दोन्ही खुरांमध्ये किंवा खुराच्यामधील भागात फोड येतात. काही शेळ्या,मेंढ्यांमध्ये तोंडात फोड येतात. त्यामुळे लाळ गळणे किंवा जीभेने लाळ चाटणे, ताप येणे, इत्यादी लक्षणे दिसतात. जीभ, टाळू,ओठांवर फोड, जखमा असल्यामुळे त्यांना खाता येत नाही. काही नवजात अर्भके कोणतेही लक्षणे न दाखवता अचानकपणे दगावतात. प्रामुख्याने हृदयात होणाऱ्या विकृतीमुळे नवजात अर्भकामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते.

उपचार :

- तोंड, पायांवरील जखमा पोटॅशियम परमॅंग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात.

- जखमांवर ग्लिसरीन तसेच जंतूनाशक मलम लावावे.

- पशुवैद्यकाकडून तातडीने उपचार करावेत.

- आजारी शेळ्या, मेंढ्यांना चांगल्या उत्तम प्रतीचे मऊ खाद्य आणि पाणी पाजावे.

प्रतिबंध :

- संसर्ग झालेल्या शेळ्या,मेंढ्यांना कळपामधून वेगळे करावे. नवीन कळपात समावेश करू नये.

- कोणतेही खाद्य, वस्तू, माणसे जे संसर्ग झालेल्या शेळ्या,मेंढयाच्या संपर्कात आले असेल ते निरोगी शेळ्या,मेंढयांपासून दूर ठेवावेत.

- वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT