Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : महिलांना सणासुदीला साडीची भेट

Latest Marathi News : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Team Agrowon

Alibaug News : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कुटुंबातील महिलांना सरकारच्या माध्यमातून दरवर्षी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाची संख्या ८३ हजार सहा इतकी असून प्रत्येक कुटुंबास एक साडी स्वस्त धान्य दुकानांतून दिली जाणार आहे. याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून केली जात आहे.

सरकारने नुकतीच योजनेची घोषणा केली असून योजनेला ‘मोफत साडी योजना’ किंवा ‘कॅपट्वीव मार्केट योजना’ या नावाने ओळखले जात आहे. आता महिलांना रेशन धान्यासोबत पाच वर्षांसाठी दरवर्षी एक साडी याप्रमाणे पाच साड्या वाटप केल्या जाणार आहेत.

१० नोव्हेंबर २०२३ रोजी अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी देण्याचा निर्णय घेतला असून अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वस्‍त्रोद्योग विभागाने या संदर्भात निर्णय घेतला आहे.

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी साडी वाटप होईल.

राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी असून रायगड जिल्ह्यात ८३ हजार सहा इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पाच वर्षे मोफत साडी वाटप केले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT