Mango Agrowon
ॲग्रो विशेष

शिवनेरी हापूसला ‘जीआय’ मानांकन मिळवून देणार

मुंबई बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांची माहिती

टीम ॲग्रोवन

पुणे ः जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शिवनेरी हापूस (Shivneri Hapus) आंब्याला भौगोलिक निर्देशांक (GI For Mango) (जीआय) मानांकन मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे (Sanjay Pansare) यांनी दिली.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर जून महिन्यात जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंब्याचा हंगाम सुरू होतो. या आंब्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे मुंबई, पुणे यासारख्या बाजारपेठांमध्ये या आंब्याला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी असते. या आंब्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुंगधामुळे शिवनेरी हापूस ‘जीआय’ मानांकन मिळविण्यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीद्वारे २५ लाख रुपयांचा निधीदेखील देण्यात आला असून, ‘जीआय’ मानांकनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी म्हैसूर येथे पाठविण्यात आला आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे व महानंदा चे कार्यकारी अधिकारी व आंबा उत्पादक अभिमन्यू काळे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी अभिमन्यू काळे यांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आंबा बागेतील झाडांची फळे शरद पवार व अजित पवार यांना भेट देत शिवनेरी हापूस आंब्याबाबत माहिती दिली. यासंदर्भात लवकरच या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या आंब्याचे वितरण जून महिन्यात योग्य पद्धतीने होण्यासाठी नियोजन करण्याकरिता बैठक घेणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे पानसरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT