Lemon Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture GI : अकोल्याच्या कागदी लिंबाला ‘जीआय’

Paper Lemon GI : अकोला जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या कागदी लिंबाला ‘जीआय’ मानांकन मिळाल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या कागदी लिंबाला ‘जीआय’ मानांकन मिळाल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. हिंगणा-वाडेगाव (ता. पातूर) येथील अथर्व लिंबू उत्पादक व प्रक्रिया शेतकरी गटाच्या नावावर ही नोंद झाली आहे. या प्रक्रियेमुळे पिकाला राजाश्रय मिळावा तसेच संशोधन, प्रक्रियेच्या अंगाने काम पुढे जावे अशा स्वरूपाची अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे.

अकोला जिल्ह्यात वाडेगाव भाग हा कागदी लिंबाचे माहेरघर समजले जाते. जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर लागवड असल्याने या पिकाची जगभर ओळख निर्माण व्हावी यासाठी शासन व शेतकरी स्तरावर प्रयत्न सुरू होते. या पिकाला जीआय मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीने आर्थिक सहकार्य केले. तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पुढाकार घेतला तर कृषी विभागातील तंत्र अधिकारी ज्योती चोरे यांनी तांत्रिक सहाय्य केल्याने हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला.

जिल्ह्यात कागदी लिंबू हे ईशान्येतून आल्याचे सांगितले जाते. १९६८ दरम्यान जिल्ह्यात या पिकाची प्रायोगिक तत्त्वावर वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी लागवड केली. तेथून पिकाचा विस्तार होत गेला. आज जिल्ह्यात शासकीय नोंदीनुसार सुमारे २२०० हेक्टरपर्यंत क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. मात्र दर वर्षी यात वाढच होत आहे. कागदी लिंबाची सर्वाधिक लागवड विदर्भात विशेषतः अकोला, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यांत केली जाते.

अकोला कागदी लिंबू चवीला आंबट, आम्लयुक्त रस व सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. फळे आकाराने लहान, गुळगुळीत आणि चमकदार असतात. कागदी लिंबाच्या विविध जातीही तयार झाल्या आहेत. मात्र, इतर कुठल्याही लिंबांपेक्षा यामध्ये सुमारे ५७ टक्क्यांपर्यंत रसाचे प्रमाण अधिक आहे.

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे लिंबाची बाजारपेठ असून तेथून दररोज दिल्ली, राजस्थानमध्ये विक्रीला लिंबे पाठवली जातात. या पिकाला जीआय मिळाल्याने मार्केटिंगच्या अंगाने फायदा होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. या जीआय प्रमाणपत्राचे लवकरच शासनस्तरावरून वितरणाचे नियोजन केले जात आहे.

अकोला जिल्ह्यात वाडेगाव परिसरात लिंबू हे एक प्रमुख नगदी पीक आहे. शेतीला इतर जोडधंद्याप्रमाणे लिंबू हे पीक आहे. ज्यांच्याकडे लिंबाची बाग आहे, त्या भागात शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. दर आठवड्याला घरात पैसा येतो. या पिकाला शासनाने राजाश्रय देण्याची गरज आहे.
- नितीन उजाडे, अध्यक्ष, -सचिन कोकाटे, सचिव, अथर्व लिंबू उत्पादक व प्रक्रिया शेतकरी गट, हिंगणा-वाडेगाव, जि. अकोला
अकोल्याच्या कागदी लिंबाला जीआय मिळाल्याने निर्यात व भाव मिळण्यासाठी निश्‍चित भविष्यात फायदा होईल. हे पीक फायदेशीर असल्याने क्षेत्र वाढीला प्रोत्साहन मिळेल.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला
अकोला जिल्ह्यातील एक महत्त्वाचे फळपीक असलेल्या कागदी लिंबाला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात या फळपिकाचा विस्तार होण्यास मोठी मदत मिळेल. त्याचा प्रत्यक्ष लाभ जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
- अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT